FIFA Women World Cup स्पर्धेला मिळणार नवा विजेता! या दोन संघांमध्ये रंगणार फायनलचा थरार

FIFA Women World Cup Final: फिफा महिला वर्ल्डकपमधील अंतिम दोन संघ निश्चित झाले असून यंदा नवा विजेता मिळणार आहे.
FIFA Women World Cup 2023 Final
FIFA Women World Cup 2023 Final Dainik Gomantak

FIFA Women's World Cup 2023:

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे फिफा महिला वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेतील आता अंतिम दोन संघ निश्चित झाले आहेत. स्पेन आणि इंग्लंड या दोन महिला फुटबॉल संघांनी अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

स्पेन आणि इंग्लंड या संघांनी पहिल्यांदाच अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे यंदा महिला वर्ल्डकप 2023 स्पर्धेला नवा विजेता मिळणार हे निश्चित झाले आहे. स्पेनने १५ ऑगस्ट रोजी उपांत्य सामन्यात स्विडनला 2-1 अशा गोल फरकाने पराभूत करत अंतिम सामना गाठला.

तसेच इंग्लंडने 16 ऑगस्ट रोजी यजमान ऑस्ट्रेलियाला उपांत्य सामन्यात 3-1 अशा गोल फ फरकाने पराभूत केले आणि अंतिम सामना गाठला.

त्यामुळे आता रविवारी (20 ऑगस्ट) स्पेन आणि इंग्लंड संघांमध्ये अंतिम सामना सिडनीमध्ये रंगणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरु होईल.

FIFA Women World Cup 2023 Final
मैदानात उतरताच अवघ्या 16 वर्षीय खेळाडूने FIFA World Cup मध्ये रचला इतिहास!

तसेच उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या स्विडन आणि ऑस्ट्रेलिया संघात तिसऱ्या क्रमांकासाठी सामना होईल. तिसऱ्या क्रमांकाचा सामना शनिवारी (19 ऑगस्ट) ब्रिस्बेनला रंगणार आहे.

स्पेनचा स्विडनविरुद्ध विजय

स्पेन आणि स्विडन यांच्यात झालेला उपांत्य सामना चांगलाच चुरशीचा झाला होता. अखेरपर्यंत या सामन्यात रोमांच पाहायला मिळाला. पहिल्या हाफमध्ये कोणालाच गोल साकारता आला नव्हता. तसेच दुसऱ्या हाफमध्येही सुरुवातीला कोणीच गोल करू शकले नव्हते. पण सामन्यातील अखेरचे 10 मिनिटे नाट्यमय ठरले.

सामन्याच्या 81 व्या मिनिटाला सलमा पॅरालुएलोने स्पेनसाठी पहिला गोल नोंदवला. त्यानंतर स्विडनकडून 88 व्या मिनिटाला रेबेका ब्लॉमक्विस्टने गोल करत बरोबरी साधून दिली होती.

पण ही बरोबरी स्विडनला राखता आली नाही आणि 89 व्या मिनिटाला स्पेनकडून ओल्गा कार्मोनाने दुसरा गोल केला आणि आघाडी मिळवून दिली. स्पेनने ही आघाडी शेवटपर्यंत टीकवली आणि अंतिम सामनाही गाठला.

FIFA Women World Cup 2023 Final
FIFA Women World Cup: फ्रान्सला हरवूनऑस्ट्रेलियाने रचला इतिहास, प्रथमच उपांत्य फेरीत मारली धडक

इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाला धक्का

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या उपांत्य सामन्यात सुरुवातीला दोन्ही संघांनी एकमेकांना तगडी लढत दिली होती. पहिल्या 30 मिनिटात दोन्ही संघांच्या खात्यात गोल जमा झाले नव्हते.

पण एला टूनने 36 व्या मिनिटाला गोल करत इंग्लंडचे खाते उघडले. ही आघाडी पहिल्या हाफपर्यंत कायम ठेवण्यात इंग्लंड यशस्वी झाले. मात्र दुसऱ्या हाफमध्ये सामन्याच्या 63 व्या मिनिटाला सॅम केरने शानदार गोल करत ऑस्ट्रेलियाला बरोबरी साधून दिली. तिचा हा गोल इतका शानदार होता की अनेकांनी त्याचे कौतुक केले.

मात्र ऑस्ट्रेलियाला लय कायम ठेवता आली नाही. इंग्लंडकडून लॉरेन हेम्पने 71 व्या मिनिटाला आणि एल्सिया रुसोने 86 व्या मिनिटाला गोल करत आघाडी मिळवून दिली. ही आघाडी इंग्लंडने अखेपर्यंत टिकवली आणि सामनाही जिंकला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com