Olga Carmona: विजयाला दु:खाची किनार! जेव्हा तिने ऐतिहासिक विजयाचा गोल डागला तेव्हा तिचे वडिल...

Women's FIFA World Cup: स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनने सोमवारी सांगितले की, ओल्गाच्या वडिलांचे निधन झाले आहे. तर तिची आई आणि इतर नातेवाईक फायनल पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते.
Olga Carmona
Olga CarmonaDainik Gomantak
Published on
Updated on

Women's FIFA World Cup: स्पेनसाठी महिला फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात निर्णायक गोल करणाऱ्या ओल्गा कार्मोनाला सामन्यानंतर कळले की तिचे वडिल आता या जगात राहिले नाहीत.

स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनने सोमवारी सांगितले की, ओल्गाच्या वडिलांचे निधन झाले आहे. दरम्यान, तिची आई आणि इतर नातेवाईक फायनल पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते.

दरम्यान, मृत्यूच्या कारणांची सविस्तर माहिती महासंघाने दिली नाही. दुःखद बातमी येण्यापूर्वी कार्मोनाच्या कुटुंबीयांनी विजयाचा आनंद लुटला. कार्मोनाने X (ट्विटर) वर लिहिले की, 'याबद्दल काहीही माहिती नसताना, गेम सुरु होण्यापूर्वी माझ्यासोबत माझा सितारा होता.

मला माहित आहे की, काहीतरी करुन दाखवण्यासाठी तुम्ही मला शक्ती प्रदान केली. तुमच्या आत्म्याला शांती लाभो डॅड.' रॉयटर्सच्या मते, कार्मोनाच्या वडिलांचे शुक्रवारी निधन झाले.

Olga Carmona
FIFA Women's World Cup: स्पेन नवा विश्वविजेता! फायनलमध्ये इंग्लंडला चारली पराभवाची धूळ

दुसरीकडे, अंतिम शिटी वाजल्यानंतर स्पॅनिश खेळाडूंनी मैदानात आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. यानंतर कार्मोनानेही पुरस्कार सोहळ्याला सामान्य पद्धतीने हजेरीही लावली. परंतु तोपर्यंत तिला तिच्या वडिलांच्या निधनाची माहिती नव्हती.

स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनने ट्विटर करत सांगितले की, 'आम्ही तुझ्या पाठिशी आहोत ओल्गा. तु स्पॅनिश फुटबॉलच्या इतिहासाचा एक भाग आहे.' कार्मोनाच्या 29व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर स्पेनने सिडनी येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा (England) 1-0 असा पराभव करुन विजेतेपद पटकावले.

Olga Carmona
FIFA Women World Cup स्पर्धेला मिळणार नवा विजेता! या दोन संघांमध्ये रंगणार फायनलचा थरार

कार्मोना रियल माद्रिदसाठी क्लब फुटबॉल खेळते. ती लेफ्ट बॅक पोझिशनवर खेळते. उदाहरणार्थ, 2010 च्या फिफा पुरुष विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत, महान स्पॅनिश खेळाडू आंद्रे इनिएस्टाने नेदरलँड्सविरुद्ध अतिरिक्त वेळेत गोल करुन स्पेनला चॅम्पियन बनवले होते. ओल्गा कार्मोनाने आता नेमके तेच केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com