FIFA Awards: पुन्हा मेस्सी वि. एमबाप्पे! सर्वोत्तम फुटबॉलरसाठी अंतिम तिघांची नावं जाहीर, पाहा संपूर्ण यादी

फिफा पुरस्कारांसाठी प्रत्येक विभागातून तीन सदस्यांची अंतिम निवड झाली आहे.
Lionel Messi | Kylian Mbappe
Lionel Messi | Kylian MbappeDainik Gomantak
Published on
Updated on

FIFA Best Awards: फिफाने शुक्रवारी 2022 वर्षातील पुरस्कारांसाठी अंतिम तीन सदस्यांच्या नावांची घोषणा केली आहे. गेल्या महिन्यात फिफाने या पुरस्कारांसाठी नामांकने जाहीर केली होती. त्यानंतर झालेल्या मतदानातून प्रत्येक पुरस्काराच्या विभागातून अंतिम तीन नावे निश्चित झाली आहेत.

फिफाने जाहीर केल्याप्रमाणे सर्वोत्तम पुरुष फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनल मेस्सी, फ्रान्सचा कायलिन एमबाप्पे आणि करिम बेंझमा या तीन खेळाडूंची अंतिम निवड झाली आहे. आता यातून एका खेळाडूला हा पुरस्कार दिला जाईल.

Lionel Messi | Kylian Mbappe
FIFA Awards साठी नामांकनं जाहीर; मेस्सी-एमबाप्पेसह 'या' खेळाडूंचा समावेश, मात्र रोनाल्डोला जागा नाही

मेस्सी आणि एमबाप्पे यांनी गेल्यावर्षी झालेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये शानदार कामगिरी केली होती. मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने हा वर्ल्डकप जिंकला होता. तसेच या स्पर्धेत मेस्सीने एकूण 7 गोल केले होते. यात अंतिम सामन्यात त्याने फ्रान्सविरुद्ध केलेल्या दोन गोलचाही समावेश आहे. त्याला या वर्ल्डकपमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही निवडण्यात आले होते.

तसेच एमबाप्पेने फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये 8 गोल करत गोल्डन बूट जिंकला होता. त्याने अंतिम सामन्यात अर्जेंटिनाविरुद्ध 3 गोल नोंदवले होते. पण त्याला संघाला विजेतेपद मिळवून देण्यात अपयश आलेले. त्याचबरोबर बेंझमाला मात्र या वर्ल्डकपला दुखापतीमुळे मुकावे लागले होते. पण त्याची एकूण गेल्यावर्षीची विविध स्पर्धेतील कामगिरी चांगली झाली होती.

सर्वोत्तम महिला पुरस्कारांसाठीही तिघींची निवड

सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू पुरस्कारासाठी बेथ मिड, ऍलेक्स मॉर्गन आणि ऍलेक्सिया पुटेलास या तिघींची अंतिम निवड झाली आहे. सर्वोत्तम खेळाडूंशिवाय सर्वोत्तम प्रशिक्षक आणि गोलरक्षक पुरस्कारांसाठीही अंतिम तीन जणांची निवड झाली आहे. दरम्यान, फिफा पुरस्कार सोहळा पॅरिसला 27 फेब्रुवारीला पार पडणार आहे.

या पुरस्कारांसाठी गेल्या महिन्यात नामांकने जाहीर झाल्यानंतर लोकांकडून मतदान झाले होते. त्यानुसार अंतिन 3 जणांची प्रत्येक विभागातून निवड करण्यात आली असून आता राष्ट्रीय प्रशिक्षक, कर्णधार, पत्रकार आणि चाहते यांचा समावेश असलेली ज्यूरी सदस्य विजेता ठरवण्यासाठी मतदान करतील.

या पुरस्कारांसाठी खेळाडूंची 8 ऑगस्ट 2021 ते 18 डिसेंबर 2022 या दरम्यानची कामगिरी लक्षात घेण्यात आली आहे.

Lionel Messi | Kylian Mbappe
Lionel Messi: अमेरिकेत 2026 ला फिफा वर्ल्डकप खेळणार की नाही? मेस्सी म्हणतोय...

फिफाकडून पुरस्कारांसाठी अंतिम निवड झालेले 3 सदस्य

सर्वोत्तम पुरुष खेळाडू - करिम बेंझमा, कायलिन एमबाप्पे, लिओनल मेस्सी.

सर्वोत्तम महिला खेळाडू - बेथ मिड, ऍलेक्स मॉर्गन आणि ऍलेक्सिया पुटेलास

सर्वोत्तम पुरुष प्रशिक्षक - कार्लो एन्सेलोटी, पेप गार्डिओला, लिओनेल स्कॅलोनी.

सर्वोत्तम महिला प्रशिक्षक - सोनिया बोम्पास्टर, पिया सुंधगे, सारिना विगमन.

सर्वोत्तम पुरुष गोलरक्षक - यासिन बोनौ, थाबौट कोर्टियस, एमिलियानो मार्टिनेझ.

सर्वोत्तम महिला गोलरक्षक - एन-काट्रिन बर्गर, मेरी एर्प्स, ख्रिस्तिएन एन्डलर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com