GFA Taca Goa U20 League : एफसी गोवा संघास तासा गोवा करंडक फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद

धेंपो क्लबवर एका गोलने निसटती मात
GFA Taca Goa U20 League
GFA Taca Goa U20 LeagueDainik Gomantak

एफसी गोवाने अंतिम लढतीत धेंपो स्पोर्टस क्लबवर एका गोलने विजय नोंदवून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) 20 वर्षांखालील तासा गोवा करंडक फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळविले.

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर रविवारी झालेल्या अंतिम लढतीत जॉर्डन बोर्जिस याने ३४व्या मिनिटास केलेला गोल निर्णायक ठरला. त्यामुळे एफसी गोवा संघाला मोसमात महत्त्वपूर्ण विजेतेपद पटकावता आले.

GFA Taca Goa U20 League
Goa Tourism : देशभरातील पर्यटकांचे पाय वळले गोव्याकडे; किनारे गजबजले

गोल नोंदविण्यापूर्वी जॉर्डनला दोन चांगल्या संधी प्राप्त झाल्या होत्या. पहिल्या वेळेस धेंपो क्लबच्या गोलरक्षकाने, तर दुसऱ्यांदा बचावपटूने प्रयत्न यशस्वी ठरू दिला नाही. अर्ध्या तासाच्या खेळानंतर जोव्हियल डायस याच्या असिस्टवर जॉर्डनने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली.

पूर्वार्धात आघाडी घेतल्यानंतर एफसी गोवाने ती भेदली जाणार नाही याची दक्षता घेतली. धेंपो क्लबनेही गोलसाठी प्रयत्न केले, पण त्यांना संधी साधणे शक्य झाले नाही.

GFA Taca Goa U20 League
कळंगुट, कोलवा समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहिम; शेकडो नागरिकांसह भारतीय नौदलाच्या जवानांचा सहभाग

चार वयोगटात विजयी छाप

एफसी गोवाने गोवा फुटबॉल असोसिएशनच्या 2022-23 मोसमात चार वयोगटात विजेतेपद प्राप्त करण्याची किमया साधली. 20 वर्षांखालील तासा गोवा करंडक जिंकण्यापूर्व एफसी गोवाने 13 वर्षांखालील, 15 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत जेतेपदास गवसणी घातली होती. एफसी गोवाच्या 14 वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल संघाला उपविजेतेपद प्राप्त झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com