I-League 2 : एफसी गोवाचा सलग दुसरा पराभव

अहमदाबादच्या एआरए संघाचा सहज विजय
FC Goa team player
FC Goa team playerDainik Gomantak
Published on
Updated on

द्वितीय विभाग आय-लीग फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा संघाला रविवारी सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. अहमदाबादच्या एआरए एफसीने त्यांना 3-0 असा सहजपणे नमवत स्पर्धेच्या ड गटात सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

सामना अहमदाबाद येथील शाहीबाग पोलिस स्टेडिमयमवर झाला. एआरए एफसीच्या विजयात शानिद वालन याने दोन गोल केले. त्याने अनुक्रमे 24 व 36व्या मिनिटास चेंडूला गोलनेटची अचूक दिशा दाखविली. याशिवाय जेकब कट्टूकॅरेन याने 22व्या मिनिटास गोल नोंदविला.

FC Goa team player
म्हापसावासियांच्या खिशाला कात्री! आता घरातील कुत्र्यांसाठीही भरावा लागणार कर; पालिकेतर्फे इतर करातही वाढ

बारा मिनिटांत दोन गोल स्वीकारल्यानंतर एफसी गोवाला सामन्यात मुसंडी मारणे कठीण ठरले. अगोदरच्या लढतीत हैदराबाद एफसीवर 2-1 अशी मात केलेल्या एआरए संघाचे आता दोन विजयामुळे गटात सर्वाधिक सहा गुण झाले आहे.

स्पर्धेतील पहिल्या लढतीत धेंपो क्लबकडून एका गोलने हार पत्करलेल्या एफसी गोवाला अजून गुणतक्त्यात खाते उघडता आलेले नाही.

FC Goa team player
Goa Liquor Seized: दवाच्या नावाखाली दारूची वाहतूक, पुण्यात गोवा बनावटीची 66 लाख रूपयांचे मद्य जप्त

ड गटात रविवारी झालेल्या आणखी एका सामन्यात अंबरनाथ युनायटेड अटलांटा संघाने हैदराबाद एफसीवर 2-1 फरकाने मात केली. अंबरनाथच्या संघाचा हा पहिलाच सामना होता, तर हैदराबादने लागोपाठ दुसऱ्या सामन्यात पराभूत व्हावे लागले. या गटातील पुढील लढती 25 मार्च रोजी होतील.

तेव्हा हैदराबाद व धेंपो क्लब यांच्यात, तर अंबरनाथ युनायटेड व एआरए एफसी यांच्यात लढत होईल. एफसी गोवाचा पुढील सामना 30 मार्च रोजी नागोवा पंचायत मैदानावर अंबरनाथ युनायटेड अटलांटा एफसीविरुद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com