म्हापसावासियांच्या खिशाला कात्री! आता घरातील कुत्र्यांसाठीही भरावा लागणार कर; पालिकेतर्फे इतर करातही वाढ

विविध सेवांसाठी कर आणि शुल्कात वाढ सुचविल्याने म्हापसातील रहिवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
Mapusa Municipal Council
Mapusa Municipal CouncilDainik Gomantak

Mapusa Municipal Council: म्हापसा नगरपरिषदेने नवीन आर्थिक वर्षापासून घर करात तब्बल 110 टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावासह विविध सेवांसाठी कर आणि शुल्कात वाढ सुचविल्याने म्हापसातील रहिवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

फक्त एवढेच नव्हे तर आता घरात असलेल्या पाळीव कुत्र्यासाठीही कर भरावा लागणार आहे. घरातील प्रत्येक कुत्र्यामागे मालकाला 500 रुपये कर लावण्याचाही प्रस्ताव नगरपरिषदेतर्फे देण्यात आला आहे.

Mapusa Municipal Council
Accidents in Goa: बस्तोडा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलावर कार-रिक्षाची जोरदार धडक; एकजण गंभीर जखमी

दुसरीकडे, पाणी आणि वीज कनेक्शनसाठी ना-हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नागरी संस्थेने शुल्कात 400 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापार परवाना, घर दुरुस्ती परवाना, हस्तांतरण शुल्क इत्यादींसह इतर विविध कर वाढवण्याची योजना देखील प्रस्तावित करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे व्यावसायिक प्रकल्पांसाठी बांधकाम परवाना शुल्क 1.5 टक्क्यांवरून 2.5 टक्क्यांपर्यंत म्हणजे 80 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे. शुल्कात वाढ करून जमा होणारा अतिरिक्त निधी पालिका कर्मचार्‍यांच्या पगारासाठी आणि विकास कामे करण्यासाठी वापरण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.

संदर्भात मुख्याधिकारी अमितेश शिरवोईकर यांनी प्रसारित केलेल्या नोटमध्ये म्हटले आहे की, "कचरा व्यवस्थापन, कर्मचार्‍यांचे पगार आणि इतर विकासकामांसाठी परिषदेला मोठ्या प्रमाणात महसुलाची गरज असल्याने नवीन दरांचा अवलंब करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येत आहे."

विविध कर आणि शुल्कांवर निश्चित केलेले दर राज्यातील समान वर्गाच्या इतर नगरपालिकांच्या तुलनेत खूपच कमी असल्याचेही या नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. करात वाढ केल्याने सर्वसामान्यांवरचा बोजा नक्कीच वाढला आहे.

याबाबत आरटीआय कार्यकर्ते जवाहरलाल शेट्ये म्हणाले की, नगरपरिषद करवाढीसाठी केवळ सबबी दाखवत आहे. म्हापसा नगरपालिका ही राज्यातील सर्वात श्रीमंत नगरपालिका आहे. पालिका अनावश्यकपणे अतिरिक्त तात्पुरते कर्मचारी नियुक्त करते आणि त्यांना कोणतेही काम करण्यासाठी पगार देते.

म्हापसा नगरपरिषद सोमवारी बोलावलेल्या विशेष बैठकीत वाढीव कर, शुल्क, भाडे आणि दंड यावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com