ISL 2023-24: प्रत्येक आयएसएल सामना खडतरच : मानोलो मार्केझ

एफसी गोवाची शनिवारी फातोर्ड्यात ओडिशाविरुद्ध लढत
FC Goa Head Coach Manolo Marquez Ahead Of Odisha FC Clash
FC Goa Head Coach Manolo Marquez Ahead Of Odisha FC ClashDainik Gomantak

FC Goa Head Coach Manolo Marquez Ahead Of Odisha FC Clash: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या लढतीत एफसी गोवाने नवोदित पंजाब एफसीवर एका गोलने निसटता विजय नोंदविला, त्या कामगिरीवर यजमान संघाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ अजिबात खूष नाहीत.

या पार्श्वभूमीवर ते शनिवारी (ता. ७) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर दोन सामने अपराजित असलेल्या ओडिशा एफसीविरुद्ध खेळतील.

केवळ त्यांच्याविरुद्धचाच नव्हे, तर स्पर्धेतील प्रत्येक सामना खडतर असल्याचे मत त्यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

एफसी गोवा व मुंबई सिटीचे माजी प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील ओडिशा एफसी संघ दोन सामने अपराजित आहे.

चेन्नईयीन एफसीविरुद्ध २-० असा विजय नोंदविल्यानंतर आघाडीनंतर ओडिशाला मुंबई सिटीविरुद्ध २-२ अशी गोलबरोबरी मान्य करावी लागली. त्यांचे चार, तर एक सामना खेळलेल्या एफसी गोवाचे तीन गुण आहेत.

ओडिशाच्या जेरी माविहमिंगथांगा याने दोन्ही लढतीत गोल केले असून त्याचा धोका एफसी गोवासमोर असेल.

FC Goa Head Coach Manolo Marquez Ahead Of Odisha FC Clash
गोव्यातील 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन - CM प्रमोद सावंत

खेळावर नियंत्रणाची अपेक्षा

‘‘पंजाब एफसीविरुद्ध आम्ही अखेरच्या २०-२५ मिनिटांत केलेला खेळ निश्चितच समाधानकारक नाही. आम्ही खराब खेळलो. प्रतिस्पर्ध्यांना बरोबरीची संधी होती, मात्र गोलरक्षक अर्शदीप सिंगची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली."

"आम्ही दुसरा गोल नोंदवू शकलो नाही. आम्हाला भरपूर संधी होत्या. आता आम्हाला खेळावर अधिक नियंत्रण राखण्याची गरज आहे. संघातील खेळाडूंनी खेळावर जास्त प्रमाणात नियंत्रण ठेवले, तर आम्ही मोठ्या फरकाने जिंकू शकतो,’’ असे मार्केझ म्हणाले.

‘‘ओडिशा संघ खडतर प्रतिस्पर्धी आहे. त्यांच्यापाशी चांगले खेळाडू आणि मातब्बर प्रशिक्षक आहे. आम्ही एका कठीण संघाचा सामना करत आहोत,’’ असे ते पुढे म्हणाले. गतमोसमात काय घडले, आकडेवारी यावर आपला विश्वास नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गोव्यात खेळणे लोबेरांसाठी विशेष

‘‘मला इथे येऊन खूप आनंद झाला आहे. गोव्यात खेळणे, माझ्यासाठी विशेष आहे. येथे माझ्या कुटुंबासोबतच्या छान आठवणी आहेत,’’ असे सांगत ओडिशाचे प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांनी आठवणींना उजाळा दिले.

‘‘आता ओडिशाचा मार्गदर्शक या नात्याने गोव्यात विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त करण्यासाठी उत्साहित आहे,’’ असे ते शनिवारच्या सामन्याविषयी म्हणाले.

आयएसएल स्पर्धेविषयी ते म्हणाले, की ‘‘भारतातील फुटबॉलचा वेगाने विकास होत आहे. भारतात परत आल्याने आणि ओडिशासारख्या क्लबमध्ये काम करता आल्याने मला खूप आनंद होत आहे.’’

४६ वर्षीय लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाने २०१९ मध्ये सुपर कप, तर २०१९-२० मध्ये आयएसल लीग विनर्स शिल्ड पटकावली. २०२०-२१ मध्ये कोविडमुळे संपूर्ण आयएसएल स्पर्धा गोव्यात झाली.

तेव्हा लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई सिटी संघाने आयएसएल करंडक आणि लीग विनर्स शिल्डचा मान पटकावला होता. त्यामुळे फातोर्डा स्टेडियम त्यांच्यासाठी खास ठरले आहे.

एफसी गोवा विरुद्ध ओडिशा मागील ८ लढती

  • एफसी गोवा विजयी: ५, बरोबरी निकाल: ३

  • गतमोसमात (२०२२-२३) फातोर्डा येथे एफसी गोवा ३-० फरकाने विजयी, भुवनेश्वर येथे १-१ गोलबरोबरी

FC Goa Head Coach Manolo Marquez Ahead Of Odisha FC Clash
37th National Games 2023 Goa: गोव्याला एकूण किती पदके मिळतील सांगणे कठीण : क्रीडामंत्री गावडे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com