FC Goa News: एफसी गोवा संघाला मिळाला आक्रमक मध्यरक्षक; व्हिक्टर रॉड्रिगेझसोबत करार

आगामी मोसमासाठी नववा नवा फुटबॉलपटू
Víctor Rodríguez
Víctor RodríguezDainik Gomantak
Published on
Updated on

FC Goa News: एफसी गोवा संघाने मध्यफळीत आक्रमकतेचा समावेश करताना ३३ वर्षीय स्पॅनिश फुटबॉलपटू व्हिक्टर रॉड्रिगेझ याच्याशी एका वर्षाचा करार केला. गतमोसमात त्याने ओडिशा एफसीतर्फे सुपर कप जिंकला होता.

एफसी गोवाने 2023-24 मोसमासाठी करारबद्ध केलेला व्हिक्टर हा नववा नवा खेळाडू आहे. आयएसएल स्पर्धेत खेळण्याचा अनुभव असलेला रॉड्रिगेझ हा एफसी गोवा संघातील दुसरा परदेशी खेळाडू आहे.

यापूर्वी गोव्यातील संघाने हैदराबाद एफसीतर्फे आयएसएल खेळलेल्या ओदेई ओनाइंदिया याच्याशी करार केला होता.

Víctor Rodríguez
Mukesh Kumar: मेहनतीला सलाम! घरची परिस्थिती हलाखीची; पाचशे रुपयांसाठी स्थानिक संघात खेळणारा मुकेश कुमार टीम इंडियात

‘‘एफसी गोवा संघात काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी इच्छुक आहे. हा संघ आणि त्यांच्या संरचनेबाबत मी चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत. छान वातावरणात फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटण्यासाठी उत्सुक आहे,’’ असे रॉड्रिगेझ याने एफसी गोवाच्या करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले. ‘‘

आमचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी मी उतावीळ आहे. यापूर्वी आम्ही एकत्रित काम केले आहे आणि भारतीय, तसेच स्पेनमधील फुटबॉलमध्ये त्यांनी दिलेल्या फुटबॉल योगदानाबद्दल मी ज्ञात आहे. माझ्यावरील विश्वास सार्थ ठरवायचा आहे,’’ असे ला-लिगा स्पर्धेत खेळलेला मध्यरक्षक म्हणाला.

स्पेन, अमेरिकेत खेळण्याचा अनुभव

व्हिक्टर रॉड्रिगेझ याच्यापाशी स्पेन, तसेच अमेरिकेत व्यावसायिक क्लब फुटबॉलमध्ये साडेतीनशे सामने खेळण्याचा मोठा अनुभव आहे. रेयाल झारागोझा, एल्चे सीएफ, गेटाफे सीएफ, स्पोर्टिंग दी गिशॉन या संघांतर्फे मिळून तो ला-लिगा स्पर्धेत 143 सामने खेळला आहे.

बार्सिलोना येथे जन्मलेल्या हा खेळाडू युवा दशेत 2001 साली एफसी बार्सिलोनाची अकादमी ला मासिया येथे रुजू झाला. तेव्हा ड्रेसिंग रुममध्ये लिओनेल मेस्सी, गेरार्ड पिके, सेस्क फाब्रेगस हे त्याचे सहकारी होते.

Víctor Rodríguez
IND vs WI, 2nd Test: भारत-वेस्ट इंडिज संघात मोठा बदल! ऐतिहासिक कसोटीतून दोन खेळाडूंचे पदार्पण, पाहा Playing XI

बार्सिलोनाच्या 19 वर्षांखालील संघातून खेळल्यानंतर तो बादालोना सीएफ संघातर्फे मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळला. अमेरिकेतील मेजर लीग सॉकर (एमएलएस) स्पर्धेत तो 2017-18 मध्ये दाखल झाला.

तेथे सीटल साँडर्स संघातर्फे 53 सामने खेळल्यानंतर 2022-23 मध्ये आयएसएल स्पर्धेतील ओडिशा एफसी संघाशी करार केला. या वर्षी एप्रिलमध्ये सुपर कप जिंकलेल्या ओडिशा संघात त्याचा समावेश होता. विजेतेपदात महत्त्वपूर्ण वाटा उचलताना रॉड्रिगेझने दोन गोल व दोन असिस्ट अशी लक्षवेधक कामगिरी केली.

‘‘त्याची (व्हिक्टर रॉड्रिगेझ) सर्जनशील चमक, प्रतिस्पर्धी बचाव तोडण्याची क्षमता आणि योग्य रेषेत खेळण्याची शैली आमच्यासाठी महत्त्वाची असेल. एफसी गोवाच्या ऑरेंज जर्सीत तो अपेक्षापूर्ती करेल.’’

- रवी पुस्कूर, एफसी गोवाचे फुटबॉल संचालक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com