पणजी: दर्जेदार भारतीय फुटबॉलपटू (Footballers) महागडे आहेत, त्याऐवजी स्वस्त परदेशी खेळाडू करारबद्ध करणे फायद्याचे ठरते, असे मत एफसी गोवाचे फुटबॉल (FC Goa Football) संचालक रवी पुस्कुर (Ravi Puskur) यांनी व्यक्त केले आहे. पुस्कुर यांनी एका मुलाखतीत ही कबुली दिली आहे. महागडे फुटबॉलपटू करारबद्ध करणे सध्याच्या स्थितीत परवडणारे नाही. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास कमी किंमतीत चांगले विदेशी फुटबॉलपटूंना संघात घेणे लाभदायक ठरते, आर्थिकदृष्ट्या ते परवडते, असे पुस्कुर यांनी नमूद केले. (FC Goa Football Director Ravi Puskur Said Contracting with expensive footballers is not affordable)
आगामी मोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेसाठी एफसी गोवा संघ आणखी दोन नवे परदेशी फुटबॉलपटू करारबद्ध करणार असल्याचे पुस्कुर यांनी सांगितले. गतमोसमात त्यांनी सहा विदेशी फुटबॉलपटूंशी करार केला होता, नंतर एप्रिलमध्ये एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत खेळताना नियमानुसार त्यांना दोघा विदेशींनी वजा करून चौघांना संघात राखावे लागले होते, त्यामुळे आघाडीपटू इगोर आंगुलो व मध्यरक्षक आल्बर्टो नोगेरा यांना संघाबाहेर ठेवण्यात आले होते. नव्या मोसमात गतमोसमातील चार आणि नवे दोघे असे सहा परदेशी एफसी गोवा संघात असल्याचे संकेत पुस्कुर यांनी दिले.
आता नव्या आयएसएल नियमानुसार, 2021-22 मोसमापासून आयएसएल सामन्यात प्रत्येक संघात सात भारतीय आणि चार परदेशी फुटबॉलपटू खेळतील. प्रत्येक संघ कमाल सहा परदेशी खेळाडू करारबद्ध करू शकेल, त्यापैकी एक खेळाडू एएफसी सदस्य देशाचा असेल. याशिवाय क्लबना परदेशी मार्की खेळाडू करारबद्ध करण्याची मुभा असेल. या नव्या नियमाचा आपल्या संघाच्या कामगिरीवर परिणाम होणार नसल्याचा विश्वास पुस्कुर यांनी व्यक्त केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.