FC Goa: ड्युरँड कप आयोजनावर मार्केझ नाराज; स्पर्धेत सुधारणा आवश्यक असल्याचे मत

एफसी गोवाचे ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत आटोपले
FC Goa coach Manolo Marquez
FC Goa coach Manolo MarquezDainik Gomantak

FC Goa Coach Manolo Marquez: एफसी गोवाचे 132व्या ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत आटोपले. वादग्रस्त पेनल्टी गोलनंतर मोहन बागान सुपर जायंट्स संघाने गोव्यातील संघाला २-१ असे निसटते हरवून अंतिम फेरी गाठली.

त्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी स्पर्धा आयोजनासंदर्भात नाराजी व्यक्त करताना पुष्कळ सुधारणा आवश्यक असल्याचे नमूद केले.

सामन्यानंतर मार्केझ यांनी उपांत्य लढतीतील पंचगिरीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना संघाच्या पराभवाचा खापर अप्रत्यक्षरीत्या रेफरीवर फोडले.

FC Goa coach Manolo Marquez
Goa Professional Football League: जीनो क्लबने मिळविला पदार्पणात गुण; चर्चिल ब्रदर्सला 1-1 गोलबरोबरीत रोखले

"भारतात खेळत असतो, तेव्हा आम्हाला अशा गोष्टींची सवय असते. मागील मोसमात, एटीके मोहन बागानने बंगळूर एफसीविरुद्ध पेनल्टीच्या आधारे आयएसएल ट्रॉफी जिंकली होती. पेनल्टीचा तो निर्णय योग्य नव्हता."

"यंदाच्या ड्युरंड कप बाद फेरीत मुंबई सिटी एफसी आणि गुरुवारी एफसी गोवाविरुद्ध त्याचीच पुनरावृत्ती झाली. आत्तापर्यंत आम्हाला या परिस्थितीची कमी-अधिक प्रमाणात सवय झाली आहे. या बाबी खिलाडूवृत्तीने स्वीकाराव्या लागतात” असे मार्केझ नाखुषीने म्हणाले.

स्पर्धेच्या नियमांवर टीका

मार्केझ यांनी ड्युरँड कप स्पर्धेतील नियम विसंगत असल्याचे सांगून नापसंती व्यक्त केली. अगोदर नोंदणी केलेल्या तीस खेळाडूंव्यतिरिक्त स्पर्धा सुरू असताना आणखी खेळाडू सामावून घेण्यात आले, जे योग्य नाही.

असे नियम असलेली ड्युरँड कप जगातील एकमेव स्पर्धा असल्याचे ते उपहासाने म्हणाले. स्पर्धा जवळ आली, तरीही सहभागी संघांसाठी वेळापत्रकाबाबत स्पष्टता नव्हती, त्यामुळे स्पर्धेसाठी संघ तयार करताना त्रासदायक ठरल्याचे एफसी गोवाच्या ५४ वर्षीय मुख्य प्रशिक्षकाने सांगितले.

FC Goa coach Manolo Marquez
IND vs PAK: इशान किशनची ऐतिहासिक खेळी, एमएस धोनीला मागे टाकत केला 'हा' मोठा रेकॉर्ड!

एफसी गोवाची कामगिरी चांगली

उपांत्य फेरीतील पराभव विसरून एफसी गोवा संघाने आता आयएसएल स्पर्धेच्या तयारीवर पूर्ण लक्ष केंद्रित केल्याची माहिती मार्केझ यांनी दिली.

"आम्ही आमच्या क्लबच्या कामगिरीवर खूप आनंदी आहोत. मला वाटते की, उपांत्य लढतीत आम्ही प्रतिस्पर्ध्यांपेक्षा अधिक चांगले खेळलो. स्पर्धेत आम्ही पाच सामने चांगले खेळलो. आमचे प्रशिक्षण सत्र खूप चांगले होत असून खेळाडू मेहनत घेत आहेत, असे मार्केझ यांनी नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com