याद आ रहा है...सचिन तेंडुलकरला मैदानावर आठवायचे बप्पी दा

जगाला आपल्या गाण्याने वेड लावणारे बप्पी दा होते क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे फॅन
Famous Musician Bappi Lahiri and Sachin Tendulkar
Famous Musician Bappi Lahiri and Sachin TendulkarDainik Gomantak
Published on
Updated on

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहिरी (Bappi Lahiri) यांनी मुंबईतील रुग्णालयात आज अखेरचा श्वास घेतला. ते 69 वर्षांचे होते. 'बप्पी दा'नी 80-90 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये ब्लॉकमास्टर गाणी दिली आणि वेगळी संगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी संगीत जगात डिस्कोसंगीत खूप प्रसिद्ध केले. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचेही (Sachin Tendulkar) नाव त्याच्या चाहत्यांच्या यादीमध्ये सामील आहे. (Famous Musician Bappi Lahiri)

Famous Musician Bappi Lahiri and Sachin Tendulkar
गोल्डन मॅन बप्पी लहिरींना आवडला नव्हता राजकुमार साहेबांचा जोक

भारताचा फलंदाज सचिन तेंडुलकरने त्याच्या 'सचिन: अ बिलियन ड्रीम्स' या बहुचर्चित चित्रपटात सांगितले होते की, जेव्हा मैदानावर काही तणावपुर्ण वातावरण निर्माण व्हायचे तेव्हा तो बप्पी लहिरी यांचे "याद आ रहा है" हे गाणे ऐकत असे. यावर बप्पी दा यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी सचिनचा चाहता असल्याचे सांगितले. 'मी इंडस्ट्रीत 48 वर्षे पूर्ण केली आहेत. माझी गाणी चांगली चालली आहेत, सर्व काही ठीक चालले आहे. मला सचिन तेंडुलकर आवडतो, मी एक क्रिकेटप्रेमी आहे आणि लहानपणापासून मला या खेळाची आवड आहे. सचिन हा क्रिकेटचा देव आहे, सचिन तेंडुलकरच्या स्तुतीने आपण प्रभावित झालो असल्याचे बप्पी दा म्हणाले होते. 'माझ्यासाठी ही खूप मोठी भेट आहे. त्यांनी माझ्या गाण्याला दाद दिल्याने मी खूप प्रभावित आणि आनंदी झालो आहे, असे लहिरी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

Famous Musician Bappi Lahiri and Sachin Tendulkar
बप्पी लाहिरी इतके सोने का घालायचे?

बप्पी दा या नावाने प्रसिद्ध असलेल्या आलोकेश लहिरी यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत 'डिस्को म्युझिक' लोकप्रिय केले. बप्पी दा यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. 1980 च्या दशकात आपल्या संगीत आणि गाण्यांद्वारे लोकांची मने जिंकणाऱ्या बप्पी दा यांनी डिस्को डान्सर, शराबी आणि नमक हलाल सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये गाणी गायली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com