Euro Cup 2020 : 'इंग्लंडला झुकते माप; इटलीचा संघही जिंकू शकतो'

युरो करंडक फुटबॉल (Euro Cup football) स्पर्धेची अंतिम लढत रविवारी मध्यरात्री होत आहे. त्यावेळी यजमान इंग्लंड (England) व इटली (Italy) यांच्यात जोरदार चुरस असेल.
Bruno Coutinho
Bruno CoutinhoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: युरो करंडक फुटबॉल (Euro Cup football) स्पर्धेची अंतिम लढत रविवारी मध्यरात्री होत आहे. त्यावेळी यजमान इंग्लंड (England) व इटली (Italy) यांच्यात जोरदार चुरस असेल. या लढतीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील माजी दिग्गज फुटबॉलपटूंना इंग्लंडचा संघ प्रदीर्घ कालावधीनंतर महत्त्वाचा करंडक जिंकेल असे वाटते. इटलीने खेळात सातत्य राखले असल्याने त्यांनाही दुर्लक्षिता येणार नसल्याचे काहींचे मत आहे.

भारताचे माजी कर्णधार अर्जुन पुरस्कार विजेते ब्रुनो कुतिन्हो (Bruno Coutinho) यांच्यामते इंग्लंडला विजेतेपद पटकाविण्याची जास्त संधी आहे. लंडनमधील वेम्ब्ली स्टेडियमवर घरच्या मैदानावर खेळत असल्याने त्यांना चाहत्यांचा मोठा पाठिंबा असेल. 55 वर्षांनंतर महत्त्वाचा करंडक जिंकण्यासाठी इंग्लंडचा संघ भूकेलेला असेल, त्यामुळे इटलीच्या संघात काही चांगले खेळाडू असले, तरी इंग्लंडचे पारडे जड राहील, असे मत ब्रुनो यांनी व्यक्त केले.

Bruno Coutinho
Euro 2020 : ऑलिंपिकनंतर आता युरो कपवर देखील कोरोनाचे सावट

इंग्लिश प्रीमियर लीगमधील कामगिरी आणि या स्पर्धेचा दर्जा लक्षात घेता, इंग्लंडचा संघ जिंकावा असे वाटत असल्याचे मत भारताचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू, एफसी गोवाचे तांत्रिक संचालक डेरिक परेरा यांनी व्यक्त केले. भारताच्या 16 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक माजी आंतरराष्ट्रीय बिबियान फर्नांडिस यांनाही इंग्लंड अंतिम लढतीत इटलीला नमवेल असे वाटते. इंग्लंडचा संघ समतोल असून प्रशिक्षक गॅरेथ साऊथगेट यांच्या मार्गदर्शनाखालील संघ मानसिकदृष्ट्या कणखर असल्याचे त्यांनी नमूद केले.

इटलीही शर्यतीत

धेंपो क्लबचे माजी प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय खेळाडू मॉरिसियो आफोन्सो व माजी आंतरराष्ट्रीय मध्यरक्षक क्लायमॅक्स लॉरेन्स यांनी इटलीस झुकते माप दिले आहे. अनुभवाचा विचार करता इटली वरचढ आहे. रॉबर्टो मॅसिनी यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने परिपूर्ण आणि सातत्यपूर्ण खेळ केल्याचे आफोन्सो यांनी नमूद केले. क्लायमॅक्स यांनीही सातत्यपूर्ण कामगिरीमुळे इटलीस संभाव्य विजेते मानले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com