Euro 2020: बलाढ्य जर्मनीला धूळ चारत इंग्लंचा बाद फेरीत प्रवेश

युरो स्पर्धेच्या 25 वर्षांच्या इतिहासात इंग्लंडने प्रथमच बाद फेरीत प्रवेश केला आहे. तर उपांत्य फेरीपूर्वीच बाद होण्याची जर्मनीची ही पहिलीच वेळ आहे.
युक्रेनने स्वीडनला मात देत बाद फेरीत केला, तर युरो स्पर्धेच्या 25 वर्षांच्या इतिहासात इंग्लंडने जर्मनीला धूळ चारत सुपर 8 मध्ये प्रवेश केला.
युक्रेनने स्वीडनला मात देत बाद फेरीत केला, तर युरो स्पर्धेच्या 25 वर्षांच्या इतिहासात इंग्लंडने जर्मनीला धूळ चारत सुपर 8 मध्ये प्रवेश केला. Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

लंडन : युरो कपच्या (Euro Cup) उपांत्यपूर्व फेरीत काल आणखीन एक उलट फेर पहावयास मिळाला. इंग्लंडने (England) आपल्या घरच्या मैदानावर बलाढ्य जर्मनीला (Germany) 2-0 अशी धूळ चारत सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. युरो स्पर्धेच्या 25 वर्षांच्या इतिहासात इंग्लंडने प्रथमच बाद फेरीत प्रवेश केला आहे. तर उपांत्य फेरीपूर्वीच बाद होण्याची जर्मनीची ही पहिलीच वेळ आहे.

स्टर्लिंग पुन्हा एकदा इंग्लंडसाठी लकी ठरला आहे. आतापर्यंत झालेल्या 11 सामन्यात स्टर्लिंगने गोल केला तर त्या सामन्यात इंग्लंडला विजय मिळाला आहे. 1966 नंतर इंग्लंडने मोठ्या स्पर्धेत जर्मनीवर विजय मिळविण्याची ही पहिलीच वेळ आहे.

युक्रेनने स्वीडनला मात देत बाद फेरीत केला, तर युरो स्पर्धेच्या 25 वर्षांच्या इतिहासात इंग्लंडने जर्मनीला धूळ चारत सुपर 8 मध्ये प्रवेश केला.
Euro Cup: फ्रान्सला धक्का देत स्वित्झलँडची सुपर 8 मध्ये धडक

युरो स्पर्धेत सोमवर आणि कालचा मंगळवार हे फुटबॉल प्रेमींसाठी पर्वणीचे असे म्हणता येतील. काल मंगळवारी इंग्लंड आणि जर्मनीची रंगत संपत नाही तोवरच दुसरा एक रंगदार सामन्याचा आनंद फुटबॉल प्रेमींना घेण्यास मिळाला. पहिल्या सामन्यात इंग्लंडने घरच्या मैदानावर इतिहास रचला त्यांनी जर्मनीवर 2-0 असा विजय मिळवत सुपर 8 मध्ये धडाक्यात प्रवेश केला. तर दुसऱ्या सामन्यात युक्रेनने स्वीडनला मात देत बाद फेरीत प्रवेश केला आहे. अतिरिक्त वेळेत 121 व्या मिनिटाला युक्रेनने गोल करत सामना 2-1 असा आपल्या नावावर केला.

पहिल्या सामन्यात पूर्वाधात इंग्लंड आणि जर्मनी दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. दोन्ही संघ आक्रमणाच्या मूडमध्येच होते, मात्र दोघांनाही यश येत नव्हते. परंतु सामन्याच्या अखेरच्या सत्रात सामन्याचे चित्र पालटले. 75 मिनीटाला रहिम स्टर्लिंगने गोल करत इंग्लंडचे खाते उघडले. त्यानंतर जर्मनीने आपल्या खेळाचा वेग वाढविला पण त्यांना इंग्लंडचा डिफेन्स भेदण्यात यश आले नाही. त्यानंतर 86 व्या मिनिटाला इंग्लंडने जर्मनीवर आणखीन एक गोल करत बाद फेरीतील आपले स्थान पक्के केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com