Retirement: क्रिकेट विश्वात मोठी खळबळ, 'या' विश्वचषक विजेत्या खेळाडूने जाहीर केली निवृत्ती

Eoin Morgan Retirement Announced: 2019 चा विश्वचषक इंग्लंडला जिंकून देणाऱ्या इऑन मॉर्गनने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
Eoin Morgan
Eoin MorganDainik Gomantak
Published on
Updated on

Eoin Morgan Retirement Announced: 2019 चा विश्वचषक इंग्लंडला जिंकून देणाऱ्या इऑन मॉर्गनने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इऑन मॉर्गनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली आहे. इऑन मॉर्गनने गेल्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. आता त्याने सर्व फॉरमॅट सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्व फॉरमॅट सोडण्याचा निर्णय

इयॉन मॉर्गनने 225 एकदिवसीय सामन्यांमध्ये 13 शतकांसह 6957 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मॉर्गनच्या 14 शतकांसह 7701 धावा आहेत. त्याचवेळी, इयॉन मॉर्गनने 126 सामन्यांमध्ये इंग्लंडचे (England) नेतृत्व केले, ज्यामध्ये त्याने 76 जिंकले. त्याच्याच नेतृत्वाखाली इंग्लंडने पहिला विश्वचषक जिंकला होता.

Eoin Morgan
WPL Auction 2023: तब्बल 3.20 कोटींची बोली लागलेल्या ऍश्ले गार्डनरची कशी आहे कामगिरी?

आयर्लंडकडूनही क्रिकेट खेळला

इऑन मॉर्गनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात आयर्लंड संघाकडून खेळून केली. आयर्लंडनंतर मॉर्गनने इंग्लंड क्रिकेटमध्ये (Cricket) पदार्पण केले. इयॉन मॉर्गन त्याच्या कारकिर्दीत नेहमीच लहान फॉरमॅटचा खेळाडू राहिला आहे, म्हणूनच त्याने आपल्या कारकिर्दीत फक्त 16 कसोटी सामने खेळले.

Eoin Morgan
WPL 2023 Auction: टीम इंडियाची कॅप्टन झाली मुंबईकर! हरमनप्रीतला लागली 'इतक्या' कोटींची बोली

T20 फॉरमॅटमध्येही यशस्वी

इऑन मॉर्गनने 115 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2458 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 14 अर्धशतके झळकावली आहेत. मॉर्गनची टी-20 सर्वोत्तम धावसंख्या 91 धावा आहे. त्याने 16 कसोटी सामनेही खेळले असून, 700 धावा केल्या आहेत.

कसोटी सामन्यात मॉर्गनने दोन शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. मॉर्गन 2019 च्या विश्वचषकापासून फॉर्ममध्ये नाही, त्याचा खराब खेळ पाहूनच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com