World Cup 2023 : इंग्लंड - श्रीलंका बंगळूरमध्ये लढणार आव्हान कायम राखण्यासाठी झुंज

कर्णधार जॉस बटलर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रुक या फलंदाजांनी आपला खेळ उंचावण्याची गरज आहे.
Ben Stokes
Ben Stokes Dainik Gomantak
Published on
Updated on

World Cup 2023 : बंगळूर, गतविजेता इंग्लंड व १९९६चा विश्‍वविजेता श्रीलंका यांच्यामध्ये उद्या (ता. २६) एकदिवसीय विश्‍वकरंडकातील लढत बंगळूर येथे होणार आहे. यंदाच्या स्पर्धेमध्ये दोन्ही देशांची समान अवस्था आहे.

चार लढतींमधून एक विजय व तीन पराभव. दोन्ही देशांना या स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी विजय आवश्‍यक आहे.

इंग्लंडच्या संघाला यंदाच्या स्पर्धेमध्ये अद्याप ठसा उमटवता आलेला नाही. त्यांना फक्त एकाच लढतीत विजय संपादन करता आलेला आहे. बांगलादेशला त्यांनी धरमशाला येथे हरवले.

मात्र न्यूझीलंड, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

डेव्हिड मलान व ज्यो रुट यांचा अपवाद वगळता इंग्लंडच्या फलंदाजांकडून निराशा झाली आहे. कर्णधार जॉस बटलर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रुक या फलंदाजांनी आपला खेळ उंचावण्याची गरज आहे.

२०१९ मधील विजयाने आत्मविश्‍वास

इंग्लंडने २०१९मध्ये एकदिवसीय विश्‍वकरंडक जिंकला; मात्र या स्पर्धेमध्ये श्रीलंकन संघाकडून साखळी फेरीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे हा विजय त्यांच्यासाठी आत्मविश्‍वास उंचावणारा ठरू शकतो.

श्रीलंकन संघाने यंदाच्या स्पर्धेमध्ये फलंदाजीत दमदार कामगिरी केली आहे. सदीरा समरविक्रमा, कुशल मेंडिस, पाथुम निसांका, चरिथ असलंका यांच्याकडून पुन्हा एकदा शानदार फलंदाजीची अपेक्षा असणार आहे. अँजेलो मॅथ्यूजचे संघात पुनरागमन होते का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Ben Stokes
Goa Accident News: उड्डाणपुलावरून खाली पडून दुचाकीवरील दोघांचा मृत्‍यू

अदिल रशीदवर मदार

डावखुरा वेगवान गोलंदाज रीस टॉप्ली याने आठ विकेट बाद करीत आपली धमक दाखवली; पण बोटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला विश्‍वकरंडकामधून माघार घ्यावी लागली. आता इंग्लंडच्या गोलंदाजीची मदार फिरकी गोलंदाज अदिल रशीद याच्या खांद्यावर असणार आहे.

चारही अष्टपैलू बाहेर

विश्‍वकरंडक सुरू झाला तेव्हा इंग्लंडच्या संघात चार अष्टपैलू खेळाडूंचा समावेश होता. ख्रिस वोक्स, सॅम करन, मोईन अली, लियाम लिव्हींगस्टोन ही त्यांची नावे; पण मुंबईत पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत यापैकी एकही खेळाडू अंतिम अकरामध्ये नव्हता.

इंग्लंडच्या संघाला कोणत्या समीकरणाने मैदानात उतरायला हवे, हे समजलेले नाही. हे यावरून प्रकर्षाने दिसून येत आहे. बेन स्टोक्सचे पुनरागमन करण्यात आले. पण तो फक्त फलंदाज म्हणून संघात आला. त्याच्याकडून गोलंदाजी करवून घेण्यात आली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com