World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 40 वा सामना इंग्लंड आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला गेला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केला. विश्वचषकातील इंग्लंडचा हा दुसरा विजय आहे. यापूर्वी, इंग्लंडने बांगलादेशचा पराभव केला होता.
विश्वचषक 2023 च्या 40 व्या सामन्यात बेन स्टोक्सच्या आक्रमक शतकाच्या जोरावर इंग्लंडने नेदरलँड्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना नऊ गडी गमावून 339 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात नेदरलँड्स संघ 37.2 षटकांत सर्व गडी गमावून केवळ 179 धावा करु शकला.
नेदरलँड्सकडून तेजा निदामनुरुने सर्वाधिक धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अली-आदिल रशीदने 3-3 बळी घेतले. या विजयासह इंग्लंडचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचला आहे, तर नेदरलँड्सची शेवटच्या स्थानावर घसरण झाली आहे.
दरम्यान, या सामन्यात 340 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला नेदरलँड्सचा संघ अवघ्या 37.2 षटकात 179 धावांतच गारद झाला. संघाकडून तेजा निदामनुरुने सर्वाधिक 41 धावा केल्या. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने 38, वेस्ली बॅरेसीने 37 आणि सायब्रँड एंजेलब्रेक्टने 33 धावा केल्या.
इंग्लंडच्या (England) गोलंदाजीत मोईन अली आणि आदिल रशीद या फिरकीपटूंनी प्रत्येकी 3 बळी घेतले. तर डेव्हिड विलीला 2 आणि ख्रिस वोक्सला 1 विकेट मिळाली. या विजयासह जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचला आहे.
पहिली विकेट: मॅक्स ओ'डॉड (5), पहिली विकेट: ख्रिस वोक्स (12/1)
दुसरी विकेट: कॉलिन अकरमन (0), दुसरी विकेट: डेव्हिड विली (13/2)
तिसरी विकेट: वेस्ली बॅरेसी (37), विकेट: रनआउट (68/3)
चौथी विकेट: सायब्रँड एंजेलब्रेक्ट (33), विकेट: डेव्हिड विली (90/4)
पाचवी विकेट: बास डी लीडे (10), विकेट: आदिल रशीद (104/5)
सहावी विकेट: स्कॉट एडवर्ड्स (38), विकेट: मोईन अली (163/6)
सातवी विकेट: लोगन व्हॅन बीक (2), विकेट: आदिल रशीद (166/7)
आठवी विकेट: रोएलॉफ व्हॅन डर मर्वे (0), विकेट: मोईन अली (167/8)
नववी विकेट: आर्यन दत्त (1), विकेट: आदिल रशीद (174/9)
दहावी विकेट: पॉल व्हॅन मीकरेन (4), विकेट: मोईन अली (179/10)
दरम्यान, या सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर संघाने 9 गडी गमावून 339 धावा केल्या होत्या. संघासाठी स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने 84 चेंडूत 108 धावांची शानदार खेळी केली. त्याने 6 षटकार आणि 6 चौकार मारले.
त्याच्याशिवाय डेव्हिड मलानने 87 धावांची आणि ख्रिस वोक्सने 51 धावांची खेळी खेळली. इंग्लंडने 192 धावांत 6 विकेट गमावल्या होत्या. यानंतर स्टोक्स आणि वोक्स यांनी 129 धावांची भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. नेदरलँड्सकडून (Netherlands) बास डी लीडेने 3 आणि आर्यन दत्तने 2 बळी घेतले.
पहिली विकेट: जॉनी बेअरस्टो (15), विकेट: आर्यन दत्त, (48/1)
दुसरी विकेट: जो रुट (28), विकेट: वेन बीक (133/2)
तिसरी विकेट: डेव्हिड मलान (87), विकेट: रनआउट (139/3)
चौथी विकेट: हॅरी ब्रूक (11), विकेट: बास डी लीडे (164/4)
पाचवी विकेट: जोस बटलर (11), विकेट: वेन मीकरेन (178/5)
सहावी विकेट: मोईन अली (4), विकेट: आर्यन दत्त (192/6)
सातवी विकेट: ख्रिस वोक्स (51), विकेट: बास डी लीडे (321/7)
आठवी विकेट: डेव्हिड विली (6), विकेट: बास डी लीडे (327/8)
नववी विकेट: बेन स्टोक्स (108), विकेट: वेन बीक (334/9)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.