IND W VS ENG W: झुलन गोस्वामीचा करिष्मा, आणखी एका 'वर्ल्ड रिकॉर्ड' ला घातली गवसणी

इंग्लंडविरुद्धच्या (England) सामन्यात झुलनने टॅमी ब्युमॉन्टला (Tamsin Beaumont) आऊट करताच तिने वनडे क्रिकेटमध्ये 250 विकेट पूर्ण केल्या.
Jhulan Goswami
Jhulan GoswamiDainik Gomantak

महिला क्रिकेटमधील दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामी जेव्हा जेव्हा मैदानात उतरते तेव्हा ती नक्कीच कोणता ना कोणता विक्रम आपल्या नावावर करते. महिला विश्वचषकाच्या 15 व्या सामन्यात झुलन गोस्वामीने (Jhulan Goswami) असेच काहीसे केले. इंग्लंडविरुद्धच्या (England) सामन्यात झुलनने टॅमी ब्युमॉन्टला (Tamsin Beaumont) आऊट करताच वनडे क्रिकेटमध्ये 250 विकेट पूर्ण केल्या. (Jhulan Goswami Completed 250 Wickets In ODI Cricket After Dismissing Tamsin Beaumont)

दरम्यान, महिला क्रिकेटमध्ये झुलन गोस्वामीशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्याही गोलंदाजाला 250 बळी घेता आलेले नाहीत. तिच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या (Australia) कॅथरीन फिट्झपॅट्रिकचा नंबर लागतो, जिच्या नावावर 180 विकेट्स आहेत. वेस्ट इंडिजच्या अनिसा मोहम्मदच्या नावावर 180 विकेट्स आहेत. वनडे क्रिकेटमध्ये झुलन गोस्वामीने इतर गोलंदाजांच्या तुलनेत 38 टक्के जास्त विकेट घेतल्या आहेत.

Jhulan Goswami
Ind W Vs Aus W: शतकी खेळी करत स्मृती मंधानाची विक्रमांना गवसणी

तसेच, झुलन महिला विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाजही आहे. गोस्वामीने 41 विकेट घेत मागील सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या लिन फुलस्टोनचा विक्रम मोडला आहे. विशेष म्हणजे या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंडविरुद्ध भारतीय फलंदाजांनी फारच सुमार कामगिरी केली होती. मंधाने 35 आणि ऋचा घोषने 33 धावा केल्या. झुलन गोस्वामीनेही 20 धावांचे योगदान दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com