U19 Women World Cup T20I: दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या 19 वर्षांखालील महिला टी२० वर्ल्डकप स्पर्धेत युवा भारतीय महिला संघाने विजेतेपद जिंकले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात 19 वर्षांखालील भारतीय महिला संघाने 19 वर्षांखालील इंग्लंड महिला संघाला 7 विकेट्सने पराभूत केले. या विश्वविजेतेपदानंतर भारताची कर्णधार शफाली वर्मा भावूक झाली होती.
वर्ल्डकप जिंकल्यानंतर शफली भारताची कर्णधार या नात्याने बोलत होती. त्यामुळे तिला तिचे अश्रू रोखणे कठीण झाले होते. यावेळी भावूक झाल्याने तिचे शब्दही फुटत नव्हते.
ती आनंदाश्रू ओघळत असतानाच म्हणाली की 'संपूर्ण स्टाफचे आभार. त्यांनी आम्हाला प्रत्येक दिवशी चांगला पाठिंबा दिला.ते आम्हाला नेहमी सांगितले की आम्ही इथे ट्रॉफी जिंकायला आलो आहोत.त्यांच्यामुळे हे शक्य झाले. त्यामुळे त्यांचे आभार.'
(Shafali Verma couldn't hold happy tears after U19 India Women won U19 Women World Cup T20 final)
रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारतासमोर इंग्लंडने 69 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 14 षटकातच पूर्ण केला आणि विश्वविजयाला गवसणी घातली.
भारताय संघाकडून 69 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला खेळायला आलेल्या शफली वर्मा (15) आणि श्वेता सेहरावत (5) यांनी लवकर विकेट्स गमावल्या होत्या. मात्र सौम्या तिवारी आणि गोंगाडी त्रिशा यांनी डाव सावरताना तिसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी रचत भारताचा विजय सोपा केला.
पण भारताला विजयासाठी 3 धावांची गरज असताना बाद झाली होती. मात्र, सौम्याने 14 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विजयी धाव काढत भारताचा विजय निश्चित केला. त्रिशाने 24 आणि सौम्याने नाबाद 24 धावा केल्या.
तत्पूर्वी भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करताना इंग्लंडची एकाही फलंदाज 20 धावांचा आकडा पार करणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळे इंग्लंडचा संघ 17.1 षटकात 68 धावांवर सर्वबाद झाला.
भारताकडून तितास साधू, अर्चना देवी आणि पार्शवी चोप्रा या तिघींनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तसेच शफाली वर्मा, मन्नत कश्यप आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.