ENG vs IND: लॉर्डस् टेस्टसाठी इंग्लंडचा हुकमी एक्का येणार ?

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) दिलेल्या माहितीनुसार फिरकी गोलंदाजीचा अष्टपैलू खेळाडू संघासोबत सराव करणार आहे.
Team England are likely to include moeen ali in the squad for the Lord's Test
Team England are likely to include moeen ali in the squad for the Lord's TestDainik Gomantak
Published on
Updated on

इंग्लंडच्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये 12 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी (ENG vs IND 2nd Test) सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघात त्यांचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला याला सहभागी करुन घेतले आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) दिलेल्या माहितीनुसार फिरकी गोलंदाजीचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली (Moeen ali) संघासोबत सराव करणार आहे. कर्णधार जो रूट वगळता इंग्लंडची आघाडीची फळीला काही काळापासुन चांगला खेळ सादर करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो आहे. मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूडने खराब प्रदर्शन झाल्यास संघात बदल करण्याचे संकेत दिले आहेत. भारताविरुद्धच्या मालिकेच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंड 183 धावांवर बाद झाला. रूटच्या 109 धावांच्या जोरावर संघाने दुसऱ्या डावात 303 धावा केल्या होत्या. सिल्वरवुडने सोमवारी सांगितले की, अष्टपैलू बेन स्टोक्स आणि ख्रिस वोक्सच्या अनुपस्थितीत मोईनला परत बोलवण्याचा विचार करत आहे. (Team England are likely to include moeen ali in the squad for the Lord's Test)

सिल्वरवुडने पुढे सांगितले की, "मोईनच्या नावावर नक्कीच चर्चा होत आहे. मी आणि जो (रूट) लॉर्ड्स कसोटीबद्दल त्याला बोलणार आहोत. आम्हाला माहित आहे की, तो एक महान क्रिकेटपटू आहे तसेच तो सध्या 'द हंड्रेड' मध्ये चांगले प्रदर्शन करतो आहे. त्याने सोमवारी 23 चेंडूत अर्धशतकासह बर्मिंगहॅम फिनिक्सला 'द हंड्रेड' मध्ये विजयाकडे नेले. त्याने भारताविरुद्ध शेवटची कसोटी या वर्षी फेब्रुवारीमध्ये खेळली होती, तर देशातील त्याचा शेवटचा सामना 2019 च्या एशेज मालिकेतील पहिला होता.

Team England are likely to include moeen ali in the squad for the Lord's Test
Neeraj Chopra: 7 ऑगस्ट 'भाला फेक दिवस' म्हणुन साजरा केला जाणार

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत धोकादायक ठरू शकतो. मोईनने आतापर्यंत इंग्लंडसाठी 61कसोटींमध्ये 189 विकेट्स घेतल्या आहेत. मोईनची भारताविरुद्धची कामगिरीही चांगली राहिली आहे. त्याने इंग्लंडच्या भूमीवर भारताविरुद्ध एकूण 7 कसोटी सामने खेळले आहेत आणि या कालावधीत त्याने 31 विकेट घेण्यात यश मिळवले आहे. मोईनने भारताविरुद्ध त्याच्या देशातील सामन्यांत दोनवेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या चेन्नई कसोटी सामन्यात इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूने 8 बळी घेतले. अशा स्थितीत भारताच्या फलंदाजांना मोईन फिरकीवर नाचवतो का हे पहावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com