Eng Vs Ind: तिसऱ्या दिवस अखेर इंग्लंडची २७ धावांची बढत

जो रूट नाबाद १८० धावा, सिराजच्या नावे ४ गडी (Eng Vs Ind)
Eng Vs Ind 2nd Test 3rd Day Score Card on Lords Cricket Ground
Eng Vs Ind 2nd Test 3rd Day Score Card on Lords Cricket Ground Tweeter/ @ICC

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेच्या (Eng Vs Ind Test Series) दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंग्लंड संघाच्या 119 धावांत 3 गडी बाद झाले होते. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून इंग्लंड संघाने भारताला फलंदाजी करण्यास पाचारण केले होते. याचा योग्य फायदा घेत भारतीय संघाने पहिल्या डावात 364 धावा उभारल्या होत्या. ज्यामध्ये के एल राहुलचे शतक तर इंग्लंड तर्फे जेम्स अँडरसनचे 5 गडी महत्वाचे ठरले होते.

Eng Vs Ind 2nd Test 3rd Day Score Card on Lords Cricket Ground
ENG vs IND: लॉर्डसवर के एल राहुलच्या अंगावर फेकले शॅम्पेन बॉटलचे कॉर्क

आज दि 14 ऑगस्ट रोजी इंग्लंड संघाने कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या (2nd Match 3rd Day) खेळाला प्रारंभ केला. कालचे नाबाद राहिलेले फलंदाज जो रूट व बेअरस्टो (Captain Route & Bairstow) फलंदाजीला आले व त्यांनी कोणतेही दडपण न घेता खेळाला प्रारंभ केला. व दोन्ही फलंदाज धावांचा रतीब घालू लागले, इंग्लंडच्या या दोन्ही फलंदाजाचा विरुद्ध भारताची कोणतीच रणनिती कामी येत नव्हती. दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावले असतानाच मोहम्मद सिराज (M Siraj) ने बेअरस्टोला कर्णधार कोहलीकडे झेल देण्यास भाग पाडले. धावा फलकावर 229 धावा लागल्या असताना वैयक्तिक 57 धावांवर बेअरस्टो बाद झाला. त्यानंतर आलेल्या जॉस बटलरने काही काळ मैदानावर स्थिरावण्याचा प्रयत्न केला परंतु वैयक्तिक 23 धावसंख्येवर ईशांत शर्माने (Ishant Sharma) त्याचा त्रिफळा उडवला, नंतर आलेल्या मोइन अलीने रुटला साथ देण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही इशांत शर्मानेच कोहलीकडे झेल देण्यास भाग पाडले.

Eng Vs Ind 2nd Test 3rd Day Score Card on Lords Cricket Ground
Goa Cricket: खेळाडूंकडून सातत्य अपेक्षित ः भास्कर

मात्र दुसऱ्या बाजूने कर्णधार रूट कोणत्याच प्रकारे थांबण्याचे नाव घेत नव्हता. रूटने धावांवर धावा करत भारतीय गोलंदाजांना (Indian Bowler) अक्षरश: धूळ चारली. मोइन अली बाद झाल्यानंतर इंग्लंडचा कोणताच फलंदाज कर्णधार जो रूटला अनुकूल अशी साथ देऊ शकला नाही, परंतु जो रूट ने शेवटपर्यंत निकराची झुंज देताना भारतीय गोलंदाजांवर शेवटपर्यंत वर्चस्व राखले. इंग्लंडचा फलंदाज जेम्स अँडरसन शून्यावर बाद झाल्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 391 धावांवर संपुष्टात आला मात्र कर्णधार जो रूट 321 चेंडू खेळून काढत 180 धावांवर नाबाद राहिला (Captain Joe Route Not Out 180 runs). भारतातर्फे मोहम्मद सिराजने 4 गडी(M Siraj took 4 Wickets), ईशांत शर्मा 3 व मोहम्मद शमी 2 गडी बाद करण्यात यशस्वी ठरले. इंग्लंडचा डाव संपुष्टात आल्यानंतर पंचांनी आजच्या दिवसाचा खेळ थांबवण्याची सूचना केली.

(संक्षिप्त धावफलक तिसऱ्या दिवसाअखेर भारत प. डाव 364 धावा, इंग्लंड प. डाव 391 धावा)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com