ENG vs IND: लॉर्डसवर के एल राहुलच्या अंगावर फेकले शॅम्पेन बॉटलचे कॉर्क

Video: तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडच्या (England) चाहत्यांनी केलेल्या कृत्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये नाराजी आहे.
cork of champagne bottles thrown at KL Rahul on Lord's
cork of champagne bottles thrown at KL Rahul on Lord'sDainik Gomantak
Published on
Updated on

लंडनच्या (London) लॉर्डस क्रिकेट मैदानावर (Lords Cricket Ground) सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना सुरु आहे. या सामन्या दरम्यान भारताच्या खेळाडूंसोबत गैरव्यवहार करण्यात येत असल्याचा धक्कादायक मुद्दा समोर आला आहे. ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर क्रिकेट सामना सुरु असतानाची काही दृश्ये समोर आली आहे ज्यामध्ये इंग्लंडचे चाहते दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी केएल राहुलच्या दिशेने शॅम्पेनच्या बाटलीचा कॉर्क फेकल्याचे दिसते आहे. हा व्हीडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे. (Cork of champagne bottles thrown at KL Rahul on Lord's cricket ground during ENG vs IND Test match)

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडच्या चाहत्यांनी केलेल्या कृत्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये नाराजी आहे. सोशल मीडियावर हे व्हीडीओ शेअर करताना लोक आपला राग व्यक्त करताना दिसता आहेत.

cork of champagne bottles thrown at KL Rahul on Lord's
ICC T20 World Cup 2021:स्पर्धेत 15 खेळाडू आणि आठ अधिकाऱ्यांना परवानगी

कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रादरम्यान, टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुल सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता, त्या दरम्यान काही इंग्लंडच्या चाहत्यांनी गैरवर्तन केले आणि त्याच्यावर शॅम्पेन बॉटलचा कॉर्क फेकला. केएल राहुलला (KL Rahul) कोणत्याही प्रकारची दुखापत झाली की नाही याबद्दल माहिती नसली तरी, लॉर्डस क्रिकट मैदानाच्या प्रतिष्ठेला या लाजिरवाण्या गोष्टीमुळे गालबोट लागले आहे. दरम्यान, मागच्या सामन्या सुद्धा भारतीय खेळाडूंना वर्ण द्वेषाला सामोरे जावे लागले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com