दिल्ली: भारतीय खो-खो महासंघाची निवडणूक यावर्षी पार पडणार होती. मात्र इच्छुक उमेदवाराच्या विरोधात कुणीही उभे न राल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. महाराष्ट्राकडून संयुक्त सचिव पदी शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते व महाराष्ट्राचे माजी सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव तर कार्यकारणी सदस्य पदी राष्ट्रीय पुरस्कार छाननी समिती सदस्य, व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांची बिनविरोध निवड आहे. (Election of the Kho-Kho Federation of India was held Uncontested)
या निवडीबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या आश्रयदाते मा. अजितदादा पवार, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड अरुण देशमुख आधी खो-खो प्रेमींनी अभिनंदन केले आहे.
या निवडणुकीत जुन्या कार्यकारिणीने आपले वर्चस्व प्रस्थापित करत ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शेवटपर्यंत सर्वांशी समन्वय राखून एक नवीन पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत खालील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत असे निवडणूक अधिकारी जस्टीस राजेश टंडन यांनी कळविले आहे.
अध्यक्ष : सुधांशु मित्तल (दिल्ली)
जनरल सेक्रेटरी : महेंद्रसिंह त्यागी (दिल्ली)
खजिनदार : सुरेंद्र कुमार भुतियानी (उत्तरांचल)
उपाध्यक्ष :
भंवर सिंह पलाडा (राजस्थान)
कमलजीत आरोरा (छत्तीसगड)
लोकेश्वरा (कर्नाटक)
एम सिता रामी रेड्डी (आंध्र प्रदेश)
मधुसूदन सिंह (मणिपुर)
राणी तिवारी (हरियाणा)
सहसचिव :
डॉ. चंद्रजीत जाधव (महाराष्ट्र)
नेल्सन सॅम्यूयल (तामिळनाडू)
संजय यादव (मध्य प्रदेश)
उपकारसिंह विर्क (पंजाब)
कार्यकारणी सदस्य :
गोविंद शर्मा (महाराष्ट्र)
मो. आफताब हुसेन (आसाम)
ब्रिश भान (हरियाणा)
देवी दत्त तन्वर (हिमाचल)
जी. राधाकृष्णन नायर (केरळ)
गुरचंद सिंह (पंजाब)
हरभूषण गुलाटी (चंदिगड)
एल आर वर्मा (हिमाचल)
एम व्ही व्ही एस प्रसाद (आंध्र)
नीरज कुमार (बिहार)
प्रदुमन मिश्रा (ओरिसा)
रवींद्रनाथ बारीक (प. बंगाल)
रजत शर्मा (उत्तरांचल)
संतोष गरुड (गुजरात)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.