Video: स्मिथची बॅट तळपली, तब्बल 546 दिवसांनी ठोकले शतक

स्टीव्ह स्मिथची आंतरराष्ट्रीय शतकाची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर संपली.
Steve Smith
Steve SmithDainik Gomantak
Published on
Updated on
Summary

स्टीव्ह स्मिथची (Steve Smith) आंतरराष्ट्रीय शतकाची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर संपली. स्मिथने गाले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी नाबाद 109 धावा केल्या आहेत. 546 दिवसांनी शुक्रवारी स्मिथने 28 वे कसोटी शतक पुर्ण केले आहे. (After 546 days Steve Smith finally made an international century VIDEO)

Steve Smith
IND vs ENG: रोहित शर्मा फ्लॉप खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत

स्मिथने कसून राजिताच्या चेंडूवर शानदार कव्हर ड्राईव्हसह आपले शतक पूर्ण केले आहे. स्मिथ, पाठीच्या समस्येशी झुंजत होता, अधूनमधून त्याला वैद्यकीय उपचार मिळत होते. स्मिथने पहिल्या दिवशी 212 चेंडूत 14 देखील चौकार मारले होते.

स्मिथचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचे शतक 2021 मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीमध्ये झाले होते. स्मिथ व्यतिरिक्त, लॅबुशेनने परदेशी भूमीवर पहिले शतक झळकावले, त्याने प्रभात जयसूर्याकडून विकेट गमावण्यापूर्वी 104 धावा केल्या आहेत.

Steve Smith
भारताच्या बड्या स्टार्सना WI मालिकेसाठी 'विश्रांती' का दिली जात आहे?

डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी सुरुवातीच्या सत्रात फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दोन बाद असताना 70 धावा झाल्या होत्या. वॉर्नर (3) आणि ख्वाजा (37) हे दोघे अनुक्रमे रजिथा आणि रॅम्स मेंडिस यांनी बाद केले होते. स्मिथ आणि लॅबुशेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com