आधी मी फलंदाजीला गांभीर्याने घेत नव्हतो: रवींद्र जडेजा

भारताचा सलामीवीर मयांक अग्रवालने जडेजाची मुलाखत घेतली.
Ravindra Jadeja
Ravindra Jadeja Dainik Gomantak
Published on
Updated on

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 4 मार्चपासून मोहालीत खेळवला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा स्टार फिरकी अष्टपैलू रवींद्र जडेजाने फलंदाजी करताना शतक झळकावले. त्याने पहिल्या डावात नाबाद 175 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळली. (Cricket News)

Ravindra Jadeja
ISL: गतविजेते मुंबई सिटी स्पर्धेबाहेर; केरळा ब्लास्टर्स उपांत्य फेरीत

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताचा सलामीवीर मयांक अग्रवालने जडेजाची मुलाखत घेतली. यावेळेस जडेजा म्हणाला, टीम इंडियासाठी खेळण्याची संधी मिळाली तेव्हा मी फलंदाजीला गांभीर्याने घेत नव्हतो. मात्र, मागील दोन तीन वर्षात मी फलंदाजीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. याचा मला नक्कीच फायदा झाला. जडेजा पुढे म्हणाला, मागील दोन तीन वर्षात रणजी ट्रॉफीमध्ये मी चांगली फलंदाजी केली. अशीच कामगिरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (Cricket) करण्यासाठी मी मेहनत घेतली. आपल्या शतकाबद्दल बोलताना जडेजा म्हणाला, ऋषभ पंत बरोबर चांगली भागीदारी करण्याचा माझा विचार होता. म्हणून मी फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले.

Ravindra Jadeja
छेत्रीच्या गोलमुळे बंगळूरचा विजयी समारोप

भारताचा पहिला डाव 574-8 वर घोषित झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडियाने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 8 बाद 574 धावा करून डाव घोषित केला. रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) नाबाद 175 धावांची खेळी खेळली. ऋषभ पंतने 96, रविचंद्रन अश्विनने 61 आणि हनुमा विहारीने 58 धावांचे योगदान दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India vs Zimbabwe full squad and schedule
Rohit Sharma Retirement Rumours BCCI Interview
Argentina and Spain football players involved in an on-field altercation
FIFA World Cup 2026 Awards
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com