ब्राव्होचा मोठा खुलासा, 'करिअर घडवण्यात धोनीचा मोठा वाटा'

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या फ्रंचायझी असेलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) मध्ये आम्हा दोघांकडेही मोठा वारसा असल्याचे ब्राव्होने म्हटले आहे.
MS Dhoni & Dwayne Bravo
MS Dhoni & Dwayne BravoDainik Gomantak
Published on
Updated on

वेस्ट इंडिजचा (West Indies) माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने (Dwayne Bravo) मोठा खुलासा केला आहे. एमएस धोनीने (MS Dhoni) माझ्या क्रिकेट कारकिर्दीत मोठी भूमिका बजावली आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या फ्रंचायझी असेलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) मध्ये आम्हा दोघांकडेही मोठा वारसा असल्याचे ब्राव्होने म्हटले आहे.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज अर्थात CSK ने IPL 2022 पूर्वी रवींद्र जडेजा, एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली यांना कायम ठेवले आहे. अशा स्थितीत ड्वेन ब्राव्होला संघातून सोडण्यात आले असले तरी ब्राव्होने मेगा लिलावासाठी आपले नाव पाठवणार असल्याची पुष्टी केली आहे. ब्राव्हो म्हणाला, "मला सीएसकेने कायम ठेवले नाही, पण मी लिलावात आहे. लिलावात माझ्याकडे 100 टक्के लक्ष असणार. मी कोणत्या संघासोबत जाईन हे मला माहीत नाही. मी माझी कारकीर्द जिथे माझ्या नशिबी आहे तिथेच संपवणार आहे. "मला माहित नाही की, मला CSK द्वारे निवडले जाईल की नाही.

MS Dhoni & Dwayne Bravo
IND vs SA: दौऱ्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का, चार खेळाडूंना दुखापत

त्याचवेळी एमएस धोनीबद्दल बोलताना डीजे ब्राव्हो म्हणाला, "आम्हा सर्वांना माहित आहे की, एमएस धोनी आणि मी एकमेकांना भाऊ मानतो. आमच्यात घट्ट मैत्री निर्माण झाली आहे. तो या खेळाचा जागतिक राजदूत आहे. त्याने माझ्या क्रिकेट कारकिर्दीत खूप मदत केली. CSK मध्ये आम्हा दोघांचा खूप मोठा वारसा आहे. आम्ही त्या फ्रेंचायझीला सर्वात प्रभावशाली फ्रँचायझी बनवण्यात मदत केली आहे. आमची घट्ट मैत्री असून ती इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाची मानतो." ड्वेन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 2021 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत तो शेवटचा संघ खेळण्यासाठी आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com