आज, इंग्लंडचा आणखी एक अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने (Ben Stocks) एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, तर दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश रामदिन (Denesh Ramdin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. (Dinesh Ramdin has retired from cricket)
वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश रामदिन याने इंस्टाग्रामच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 2005 मध्ये त्याने कसोटीमध्ये पदार्पण केले होते. रामदिन शेवटचा 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजकडून खेळताना दिसून आला होता. श्रीलंकेविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यावेळी त्याने 56 धावा केल्या होत्या.
इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे रामदिनने लिहिले की- "मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे ही आनंदाची बाब आहे. गेली 14 वर्षे माझ्यासाठी एका स्वप्नासारखी होती. मी त्रिनिदाद आणि टोबॅगो देखील खेळलो आहे आणि माझे बालपणापासून मी माझे स्वप्न पुर्ण केले आहे. वेस्ट इंडिजकडून क्रिकेट खेळण्याचे माझे स्वप्न आहे.
जरी मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत असलो तरी व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेत नाहीये." त्याने पुढे लिहिले की, "माझ्या कारकिर्दीने मला जग पाहण्याची, विविध संस्कृतींमधून मित्र बनवण्याची आणि मी जिथून आलो आहे त्याचे कौतुक करण्याची संधी दिली."
तसेच तो फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहणार आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दिनेश रामदिनने वेस्ट इंडिजसाठी 74 कसोटी, 139 वनडे आणि 71 टी-20 सामन्यांमध्ये अनुक्रमे 2,898, 2,200 आणि 636 धावा केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.