Diamond League Final: नीरज चोप्राच्या निशाण्यावर आणखी एक 'रेकॉर्ड', जाणून घ्या थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पाहाल

Diamond League Final: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राचे लक्ष्य आता आणखी एका सुवर्णपदकावर आहे.
Neeraj Chopra
Neeraj ChopraDainik Gomantak

Diamond League Final: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राचे लक्ष्य आता आणखी एका सुवर्णपदकावर आहे. गेल्या महिन्यात बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरजने देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते.

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले होते. यापूर्वी, टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) नीरज चोप्राने 87.58 मीटरचा सर्वोत्तम थ्रो करुन देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते.

गेल्या वर्षी डायमंड लीगसारख्या प्रतिष्ठित स्पर्धेत नीरजने सुवर्णपदक जिंकले होते. म्हणजेच, यावेळी तो देशासाठी आणखी एक सुवर्णपदक जिंकू शकतो.

नीरज चोप्रा जेतेपद जिंकणार

डायमंड लीगच्या ऍथलेटिक्स इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारा 25 वर्षीय नीरज चोप्रा हा एकमेव भारतीय आहे. पुन्हा एकदा नीरज यूजीनमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे लक्ष्य ठेवून मैदानात उतरणार आहे.

अमेरिकेतील (America) ओरेगॉन येथील हेवर्ड फील्ड येथे ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. डायमंड लीग 2023 च्या 13 टप्प्यांत भाग घेतल्यानंतर निवडक खेळाडूंनी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

अविनाश साबळे देखील स्टीपलचेसमध्ये भारतासाठी अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता, तर मुरली श्रीशंकर लांब उडीत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता.

मात्र, आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा पाहता या दोघांनीही त्यातून माघार घेतली होती. यातच आता, तुम्ही नीरज चोप्राचे फायनल लाईव्ह कुठे पाहू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

Neeraj Chopra
Diamond League: नीरजला झुरिचमध्ये वडलेजचने टाकले मागे, पण फायनलसाठी 'गोल्डन बॉय'ने मिळवली पात्रता

तुम्ही थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पाहू शकाल?

डायमंड लीग 2023 फायनलचे टीव्ही राइट्स स्पोर्ट्स 18 कडे आहेत. म्हणजेच टीव्हीच्या माध्यमातून चाहत्यांना या चॅनलवर स्पर्धेचा आनंद घेता येईल.

जिओ सिनेमावर लाइव्ह स्ट्रीमिंग मोफत उपलब्ध असेल. नीरज चोप्राचा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री 12.50 वाजता सुरु होईल. वास्तविक, दिवस रविवार असेल आणि तारीखही 17 सप्टेंबर असेल. पण USA च्या वेळेनुसार ते 16 सप्टेंबरलाच होईल.

Neeraj Chopra
Diamond League मध्ये श्रीशंकरची लांब उडीत विक्रमी कामगिरी! नीरज चोप्राच्या पंक्तीत मिळवले स्थान

हे खेळाडू अंतिम फेरीत नीरज चोप्राला आव्हान देतील:-

ऑलिव्हर हेलँडर (फिनलंड), अँडरसन पीटर्स (ग्रेनाडा), कर्टिस थॉम्पसन (यूएसए), अँड्रियान मार्डेरे (मोल्दोव्हा), जेकब वडलेज (चेक प्रजासत्ताक).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com