Diamond League: नीरजला झुरिचमध्ये वडलेजचने टाकले मागे, पण फायनलसाठी 'गोल्डन बॉय'ने मिळवली पात्रता

Neeraj Chopra: झुरिच डायमंड लीगमध्ये भारताचे नीरज चोप्रा आणि मुरली श्रीशंकर सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी स्टेडियममध्ये फेडररची उपस्थितीही लक्षवेधी ठरली.
Neeraj Chopra
Neeraj ChopraDainik Gomantak

India's Neeraj Chopra and Murali Sreeshankar qualify for Diamond League final:

गुरुवारी (31 ऑगस्ट) रात्री उशीरा झुरिच डायमंड लीग स्पर्धा झाली. या स्पर्धेत भारताचा गोल्डन बॉय म्हणून ओळखला जाणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि लांब उडीमध्ये मुरली श्रीशंकर सहभागी झाले होते.

नीरज पुरुषांच्या भालाफेक प्रकारात 85.71 मीटर भाला फेक करत दुसऱ्या क्रमांकावर राहिला, तसेच भारताचा मुरली श्रीशंकर 7.99 मीटर लांब उडीसह पाचव्या क्रमांकावर राहिला. पण असे असले तरी दोघांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी अमेरिकेतील युजिन येथे होणाऱ्या डायमंड लीग फायनलसाठी पात्रता मिळवली आहे.

फेडररची लक्षवेधी उपस्थिती

स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर देखील झुरिच डायमंड लीगमधील स्पर्धा पाहाण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थितीत होता. त्याची ही उपस्थितीती लक्षवेधी ठरली.

वडलेजचने नीरजला टाकले मागे

भालाफेक प्रकारात नीरजने पहिल्या प्रयत्नात नीरजने 80.79 मीटर भाला फेकला. दुसरा आणि तिसरा प्रयत्न त्याचा फाऊल ठरला.चौथ्या प्रयत्नात नीरजने 85.22 मीटर लांब भाला फेक केली. मात्र तो पहिल्या क्रमांकावर जाऊ शकला नाही.

मात्र हा प्रयत्न त्याला दुसऱ्या क्रमांकावर राहण्यास पुरेसा ठरला. पाचवा प्रयत्नाही त्याता फाऊल ठरला, तर सहावा आणि अखेरच्या प्रयत्नात त्याने 85.71 मीटर लांब भाला फेकला. परंतु, जाकुब वडलेजचने केलेला भालाफेकीचे अंतर त्याच्यापेक्षा जास्त असल्याने तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

चेक गणराज्यचा जाकुब वडलेजचने 85.86 मीटर भालाफेकला असल्याने तो पहिल्या क्रमांकावर राहिला.ज्युलियन वेबर 85.04 मीटर भाला फेक करत तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

विशेष म्हणजे नीरज, वजलेजच आणि वेबर हे तिघेही वर्ल्ड ऍथलेटिक चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतर चारच दिवसात पुन्हा मैदानावर उतरले होते. 27 ऑगस्ट रोजी वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये नीरजने सुवर्णपदक जिंकले होते, तर वडलेजचने कांस्यपदकाला गवसणी घातली होती. वेबर चौथ्या क्रमांकावर राहिला होता.

दरम्यान, डायमंड लीगमध्ये या हंगामात नीरज अपराजित राहिला होता. त्याने मे महिन्यात दोहा डायमंड लीगमध्ये आणि लुसेन डायमंड लीगमध्ये विजेतेपद मिळवले होते. नीरज गेल्यावर्षीचा डायमंड लीग विजेता खेळाडू आहे.

नीरज नव्हता पूर्ण तंदुरुस्त

स्पर्धेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत नीरजने सांगितले होते की त्याच्या खांद्यामध्ये आणि पाठीत वेदना आहेत. तो मे-जूनमध्ये झालेल्या ट्रेनिंग दरम्यान त्याला छोटी दुखापत होती, त्यामुळे तो वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या दरम्यान देखील पूर्ण तंदुरुस्त नव्हता.

दरम्यान, डायमंड लीगमध्ये 23 गुणांसह तो फायनलसाठी पात्र ठरला आहे.

Neeraj Chopra
Neeraj Chopra: 'साऱ्या भारतीयांसाठी हे पदक...', वर्ल्ड चॅम्पियन झाल्यानंतर नीरजनं देशवासियांनाही केलं खूश

श्रीशंकर पाचवा

श्रीशंकर त्याची तिसरी डायमंड लीग स्पर्धा झुरिचमध्ये खेळला. तो पॅरिसमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता, तर लुसेनमध्ये 5 व्या क्रमांकावर होता. आताही तो झुरिच डायमंड लीगमध्ये पाचव्या क्रमांकावर राहिला.

श्रीशंकरने पहिल्याच प्रयत्नात 7.99 मीटर लांब उडी मारली होती. पण त्यापेक्षा लांब त्याला पुढील प्रयत्नांमध्ये जाता आले नाही. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 7.96 मीटर लांब उडी मारली, तर तिसरा प्रयत्न फाऊल ठरला.

चौथ्या प्रयत्नातही त्याने 7.96 मीटर लांब उडी मारली. पाचव्या प्रयत्नात त्याने 7.93 मीटर लांब उडी मारली. तिसऱ्या प्रयत्नापर्यंत तो तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र, चौथ्या प्रयत्नात तो पिछाडीवर पडला.

लांब उडीमध्ये पाच प्रयत्नांनंतर ग्रीसचा मिल्तियादास तेंतोग्लो 8.20 मीटर लांब उडीसह पहिल्या क्रमांकावर राहिला. जमैकाचा तजय क्लार्क (8.07 मी) दुसऱ्या, अमेरिकेचा जॅरियन लॉसन (8.05 मी) तिसऱ्या क्रमांकावर राहिला. तसेच चेक गणराज्यचा राडेक ज्युस्का (8.04 मी) चौथ्या क्रमांकावर राहिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com