मालवणमध्ये पर्यटकांची बोट बुडाली; दोघांचा मृत्यू, दोघांची स्थिती गंभीर

बोटमधील पर्यटक पुणे आणि मुंबई येथील असल्याची प्राथमिक माहिती
Boat Sink
Boat Sink Dainik Gomantak
Published on
Updated on

सद्या पर्यटन हंगामामूळे कोकणात पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनाचा अस्वाद घेत आहेत. यासाठी पर्यटक बोटींगचा ही आस्वाद घेत असतात. अशीच जय गजानन नावाची बोट मालवण तारकर्ली येथील पर्यटकांना घेऊन समूद्रात गेली होती. ती बोट बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे, तर दोघांची स्थिती गंभीर असल्याचं ही स्पष्ट झाले आहे. (Tourist boat sinks in Malvan; Both died, both in critical condition )

Boat Sink
पुण्यात ATS ची मोठी कारवाई; एकास अटक

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मालवण तारकर्ली येथे पुणे आणि मुंबई येथील पर्यटकांना घेऊन परत असताना बोट बुडाली आहे. या बोटीत एकूण 20 पर्यटक होते. यापैकी 16 पर्यटक सुखरुप आहेत.तर दोन पर्यटकांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर आहे. मृतदेह मालवण ग्रमिण रुग्णालयात आणण्यात आले आहेत. तसेच जखमींवर ही उपचार सुरु आहेत. या बोटमध्ये लहान मुलांचा ही समावेश होता. मात्र त्यांना वाचवण्यात यश आले आहे.

तसेच बोट किनाऱ्यापासून जवळच असल्याने स्थानिकांनी ही बोट बुडाल्याचे दिसताच तातडीने मदतकार्य पोहोचू शकल्याचे ही स्पष्ट झाले आहे. या अपघाताने आपत्तीग्रस्त आणि स्थानिकांनी सुरक्षेसाठी वापरलेले साहित्य, बोट यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न विचारले जात आहेत. स्थानिकांनी गर्दी घटनास्थळी गर्दी केली होती. तर मालवण प्रांताधिकारी, तहसिलदार, पोलिस यांनी ही हजेरी लावत योग्य ते निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com