पणजी: पुदुचेरीचा (Puducherry) मोसमपूर्व सराव दौरा मध्येच आटोपता घ्यावा लागलेल्या गोव्याच्या (Goa) सीनियर पुरुष क्रिकेट (Cricket) संघाला आता दिल्लीने (Delhi) मदतीचा हात दिला. त्यामुळे देशाच्या राजधानीत सराव सामने खेळण्यास संभाव्य संघाने सुरवात केली.
पुदुचेरीतील नियोजित स्पर्धा लांबणीवर पडल्यानंतर गोव्याने तेथील मुक्काम हलविला व गतआठवड्यात दिल्लीस प्रयाण केले. तेथे संभाव्य संघ के. भास्कर पिल्लई यांच्या मार्गदर्शनाखाली सरावावर लक्ष केंद्रीत करेल.
गोवा क्रिकेट संघटनेचे सचिव विपुल फडके यांनी दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहन जेटली, खजिनदार शशी खन्ना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष सी. के. खन्ना यांची भेट घेतली. त्यावेळी विपुल यांनी दिल्ली क्रिकेट संघटनेप्रती आभार व्यक्त करून मोसमपूर्व सरावाची गरज अधोरेखित केली. यावेळी विपुल यांनी दिल्ली क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संघटनेची आगामी निवडणूक व आमसभेच्या अनुषंगाने चर्चा केली.
पावसाळ्यामुळे गोव्यात क्रिकेटपटूंना बाह्य सरावाची संधी मिळत नाही. त्यामुळे अन्यश्र सरावासाठी जाणे भाग पडत असल्याचे विपुल यांनी दिल्ली क्रिकेट पदाधिकाऱ्यांना सांगितले. दिल्ली, पुदुचेरीव्यतिरिक्त मध्य प्रदेशमध्येही सराव घेण्याबाबत गोवा क्रिकेट (Goa Cricket) असोसिएशन विचार करत असल्याचे विपुल यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.