France vs Denmark: सलग दुसऱ्या विजयासह गतविजेता फ्रान्स दिमाखात 'राऊंड ऑफ 16'मध्ये दाखल

डेन्मार्कवर 2-1 गोलफरकारने विजय; दोन गोल नोंदवणारा एम्बापे ठरला फ्रान्सच्या विजयाचा शिल्पकार
France vs Denmark
France vs DenmarkDainik Gomantak
Published on
Updated on

France vs Denmark: फिफा वर्ल्डकप स्पर्धेत शनिवारी कतार येथील स्टेडियम 974 मध्ये ग्रुप डी मध्ये झालेल्या फ्रान्स विरूद्ध डेन्मार्क सामन्यात किलियन एम्बापेच्या 2 गोलच्या जोरावर फ्रान्सने डेन्मार्कला पराभूत केले. पुर्वार्धात गोलशुन्य बरोबरी असताना उत्तरार्धात मात्र हा सामना चुरशीचा झाला. सामन्यातील तिन्ही गोल उत्तरार्धात झाले. दरम्यान, सलग दुसरा विजय असल्यामुळे गतविजेत्या फ्रान्सने राऊंड ऑफ 16 या पुढील फेरीत प्रवेश निश्चित्त केला आहे.

(FIFA Football World Cup 2022)

France vs Denmark
Poland Beats Saudi Arabia: अर्जेंटिनाला हरविणाऱ्या सौदी अरेबियावर पोलंडची मात

पुर्वार्धात दोन्ही संघ गोल करू शकले नाहीत. दोन्ही संघांचा खेळ तोडीस तोड होता. फ्रान्सकडून गोलचे जास्त प्रयत्न झाले, पण त्यात यश आले नाही. तुलनेत डेन्मार्ककडून केवळ दोनच शॉट खेळले गेले, ते देखील टारगेटवर नव्हते. उत्तरार्धात मात्र दोन्ही संघात जबरदस्त चुरस पाहायला मिळाली.

उत्तरार्धात 61 व्या मिनिटाला किलियन एम्बापे याने प्रेक्षणीय गोल नोंदवत फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 68 व्या मिनिटाला डेन्मार्कच्या अँड्रियास क्रिस्टेनसेन याने गोल नोंदवत डेन्मार्कला बरोबरी साधून दिली. त्यानंतर पुर्णवेळेचा खेळ संपायला अवघी पाच मिनिटे बाकी असताना पुन्हा किलियन एम्बापेच फ्रान्सच्या मदतीला धावून आला.

त्याने 86 व्या मिनिटाला सुंदर गोल नोंदवला. डेन्मार्कचे बचावपटू आणि गोलकिपर या गोलवेळी पुर्णतः हतबल दिसले. या गोलमुळे फ्रान्सने 2-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर पुर्णवेळेचा खेळ संपेपर्यंत आणि त्यानंतर भरपाई वेळेत डेन्मार्कला फ्रान्सची ही आघाडी तोडता आली नाही. दोन गोल नोंदवणारा एम्बापे फ्रान्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

France vs Denmark
FIFA World Cup 2022: अर्जेंटिनावरील विजयाचे बक्षिस; सौदी अरेबियाच्या प्रत्येक खेळाडुला मिळणार 4 कोटींची कार

या विजयाने फ्रान्सचे दोन सामन्यात दोन विजयांसह 6 गुण झाले आहेत. त्यामुळे ग्रुप डी मधून फ्रान्सचा राऊंड ऑफ 16 मधील प्रवेश निश्चित्त झाला आहे. फ्रान्सने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 4-1 अशा गोलफरकाने पराभूत केले होते. तर डेन्मार्कची पहिली ट्युनिशियाविरोधातील लढत बरोबरीत सुटली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com