David Warner: 100 वी कसोटी, द्विशतक अन् विक्रमांचा पाऊस! वॉर्नरने 'बॉक्सिंग डे टेस्ट' बनवली ऐतिहासिक

Video: वॉर्नरने 100 व्या कसोटीत द्विशतक झळकावत सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाचीही बरोबरी केली आहे.
David Warner
David Warner Dainik Gomantak
Published on
Updated on

David Warner: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे सुरू असून हा बॉक्सिंग डे कसोटी सामना आहे. दरम्यान, या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने द्विशतकी खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

हा सामना वॉर्नरचा कारकिर्दीतील 100 वा सामना आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा सामना खास होता. त्याने या सामन्यात द्विशतकाला गवसणी घालत तो आणखी खास केला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात 2 षटकार आणि 16 चौकारांसह 254 चेंडूत 200 धावांची खेळी केली. या खेळीनंतर तो लगेचच रिटायर्ड हर्ट झाला.

(David Warner scored double hundred in in 100 th test and achieve 5 records)

David Warner
Boxing Day Test नक्की आहे तरी काय अन् टीम इंडियाचा याच्याशी कसा संबंध?

100 व्या कसोटीत द्विशतक

वॉर्नर कारकिर्दीतील 100 व्या कसोटीत द्विशतकी खेळी करणारा केवळ दुसराच खेळाडू आहे. यापूर्वी असा कारनामा केवळ जो रुटने केला आहे. जो रुटने चेन्नईमध्ये भारताविरुद्ध 2021 मध्ये कारकिर्दीतील 100 व्या कसोटीत द्विशतकी खेळी केली होती.

सचिनच्या विक्रमाशी बरोबरी

वॉर्नरचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 45 वे शतक आहे. त्यामुळे त्याने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या सलामीवीरांच्या यादीत अव्वल क्रमांकावर असेलेल्या सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे.

मास्टर-ब्लास्टर सचिननेही सलामीला खेळताना सर्वाधिक 45 शतके केली आहेत. या यादीत आता सचिन आणि वॉर्नरच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर ख्रिस गेल असून त्याच्या नावावर 42 शतके आहेत.

David Warner
David Warner झाला 'पुष्पा'चा फॅन... अल्लू अर्जुनच्या स्टाईलमध्ये गाण्यावर केला डान्स

100व्या कसोटीत शतक

वॉर्नर 100 व्या कसोटीत शतकी खेळी करणारा जगातील 10 वा खेळाडू आहे. यापूर्वी असा कारनामा कॉलिन कॉड्री (104), जावेद मियाँदाद (145), गोर्डन ग्रिनीज (149), ऍलेक स्टिवर्ट (105), इंझमाम उल हक (184), रिकी पाँटिंग (120, 143*), ग्रॅमी स्मिथ (131), हाशिम अमला (134) आणि जो रुट (218) यांनी केला आहे.

विशेष म्हणजे वॉर्नरने त्याच्या 100 व्या वनडे सामन्यात देखील शतक झळकावले होते. त्यामुळे तो कारकिर्दीतील 100 व्या वनडे आणि कसोटी सामन्यांत शतकी खेळी करणारा गोर्डन ग्रिनीज यांच्यानंतरचा दुसराच खेळाडू आहे.

दरम्यान, वॉर्नरने ही खेळी करताना 8000 कसोटी धावा देखील पूर्ण केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com