IPL 2022 चा पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात 24 मे रोजी सामना रंगला होता. या सामन्यात गुजरातने राजस्थानचा 7 गडी राखून पराभव करत फायनल मध्ये शिक्कामोर्तब केला आहे. हार्दिक पांड्याच्या संघाला अंतिम फेरीत नेण्यात डेव्हिड मिलरची (David Miller) विशेष भूमिका राहिली आहे. (David Miller has been instrumental in guiding the Gujarat Titans to the finals)
पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मिलरने कर्णधार हार्दिक पंड्यासोबत शतकी भागीदारी खेळली आहे. या महत्त्वाच्या सामन्यात त्याने 68 धावांची खेळी खेळली आहे. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 6 बाद 188 धावा केल्या होत्या. तर गुजरातने 189 धावांचे लक्ष्य 3 चेंडू राखून पूर्ण केले आहे. मिलरने शेवटच्या षटकातील 3 चेंडूंवर सलग 3 सिक्सर ठोकत सामना गुजरातच्या नावावर केला. या सामन्यात राजस्थानच्या गोलंदाजांची खिल्ली उडवणाऱ्या डेव्हिड मिलरने नंतर संघाची माफी मागितली.
गुजरात टायटन्स संघात येण्यापूर्वी डेव्हिड मिलर राजस्थान रॉयल्सच्या संघाचाच भाग होता. 2020 मध्ये तो या संघातील एक खेळाडू होता. याआधी मिलर अनेक वर्षे पंजाब किंग्जकडून सामने खेळला होता. 2020 मध्ये, जेव्हा तो पहिल्यांदा राजस्थान रॉयल्सच्या संघात सामील झाला तेव्हा त्याला फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली होती. ज्यामध्ये त्याला एकही धाव करता आलेली नाहीये. आयपीएल 2021 मध्ये, त्याने राजस्थानसाठी 9 सामने खेळले आणि 189 धावा केल्या तर यानंतर, रॉयल्सने त्याला 2022 च्या आयपीएल लिलावापूर्वी रिलीज केले.
आयपीएल 2022 लिलावाच्या पहिल्या दिवशी डेव्हिड मिलर अनसोल्ड राहिला. त्याच्यावर फ्रँचायझीने बेट लावली नाही. लिलावाच्या दुसऱ्या दिवशी राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्सने डेव्हिड मिलरला खरेदी करण्यासाठी रस दाखवला. पण नंतर गुजरात त्या लिलावात जिंकला.
गुजरात टायटन्सने डेव्हिड मिलरला 3 कोटी रुपयांना विकत घेत आपल्या संघामध्ये सामील केले. गुजरात संघात आल्यानंतर मिलर वेगळ्याच रंगात दिसून आला. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या क्वालिफायर सामन्यात त्याने शानदार खेळी करत संघाला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात त्याने 38 चेंडूत 68 धावा केल्या आहेत. यादरम्यान मिलरने 3 चौकार आणि 5 सिक्सर मारले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.