अर्रर्र खतरनाक! डॅरिल मिशेलने मारला सिक्सर अन् बॉल गेला थेट बिअरच्या ग्लासात; VIDEO

डॅरिल मिशेलने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी शानदार फलंदाजी केली आणि नाबाद 81 धावा करून पॅव्हेलियनमध्ये माघारी परतला.
Daryl Mitchell
Daryl MitchellDainik Gomantak
Published on
Updated on

न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेलने (Daryl Mitchell) ट्रेंट ब्रिज येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी शानदार फलंदाजी केली आणि नाबाद 81 धावा करून पॅव्हेलियनमध्ये माघारी परतला. (Daryl Mitchell hit a six and the ball went straight into the beer glass Video)

Daryl Mitchell
बाबर आझमने वॉर्नरला टाकले मागे, मात्र कोहलीच्या पुढे जाण्यात अपयशी

पहिल्या दिवशी 147 चेंडूंचा सामना करताना त्याने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि दोन षटकार ठोकल आहेत. यातील एक षटकार स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांच्या बिअरच्या ग्लासमध्येच पडला. आणि सध्या तो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकुळ घातल आहे.

जॅक लीचच्या डावातील 56व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मिशेलने पुढे जाऊन लाँग-ऑन बाऊंड्रीकडे एक शॉट खेळला तर चेंडू सरळ जाऊन स्टँडमध्ये बसलेल्या महिला प्रेक्षकाच्या बिअरच्या ग्लासमध्ये जाऊन पडला. तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या मॅथ्यू पॉट्सने घडलेला प्रकार सांगितला.

मात्र, त्यानंतर न्यूझीलंड संघाने त्या महिला प्रेक्षकला बिअरचा नवा ग्लास पाठवला. खेळ संपल्यानंतर मिशेलने महिलेची भेट घेऊन माफी मागितली. मिशेलने लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 108 धावांची शानदार इनिंग खेळली होती.

Daryl Mitchell
सचिनला बाद केल्यानंतर मला रातोरात प्रसिद्धी मिळाली : शोएब अख्तर

नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंड संघाने पहिल्या दिवसाचा सामना संपेपर्यंत 4 गडी गमावून 318 धावा केल्या होत्या. मिशेलशिवाय टॉम ब्लंडल 67 धावांवर पॅव्हेलियनमध्ये नाबाद परतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com