चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्या आयपीएल 2022 च्या पहिल्या सामन्यात मोईन अलीशिवाय खेळावे लागू शकते. कारण इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूला अद्याप भारतीय व्हिसा मिळालेला नाही. IPL 2022 चा पहिला सामना शनिवारी वानखेडे स्टेडियमवर गतविजेता CSK आणि उपविजेता कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. (CSK's Moeen Ali player has not yet received an Indian visa for ipl 2022)
एका स्पोर्ट्स वेबसाइटच्या वृत्तानुसार, मोईनला त्याच्या संघाच्या पहिल्या सामन्यासाठी बुधवारपर्यंत मुंबईत (Mumbai) पोहोचायचे होते कारण त्यानंतर त्याला सीएसकेच्या बायो-बबलमध्ये प्रवेश करण्यासाठी तीन दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार होते. एकंदरीत पाहता मोईनचा पहिला सामना खेळणे अशक्य वाटते.
संबंधित अहवालात म्हटले आहे की, सुपर किंग्जच्या (CSK) संघव्यवस्थापनेने देखील मान्य केले आहे की सीएसकेच्या पहिल्या सामन्यात मोईनच्या खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे. रिपोर्टनुसार, मोईनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हॉन कॉनवेला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
CSK ने IPL लिलावापूर्वी मोईन अलीला रिटेन केले होते. भारतीय खेळपट्ट्यांवर त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला कायम ठेवण्यात आले. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये (IPL 2022) त्याने 15 सामन्यात 357 धावा केल्या होत्या आणि सहा विकेट्सही घेतल्या होत्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.