Devon Conway: CSK च्या ओपनरचं शतक हुकलं, पण 'या' रेकॉर्ड लिस्टमध्ये बाबर आझमला पछाडलं

चेन्नई सुपर किंग्सचा ओपनर डेव्हॉन कॉनवेने पंजाब किंग्सविरुद्ध 92 धावा करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
Devon Conway
Devon ConwayDainik Gomantak
Published on
Updated on

Devon Conway record: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी 41 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात झाला. या सामन्यात पंजाबने 4 विकेट्सने विजय मिळवला. पण चेन्नईकडून सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने शानदार नाबाद अर्धशतकी खेळी करत सर्वांची वाहवा मिळवली. याबरोबरच त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

कॉनवेने या सामन्यात 52 चेंडूत 92 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 1 षटकार मारला. हे त्याचे आयपीएल 2023 हंगामातील पाचवे अर्धशतक आहे. तसेच या खेळीदरम्यान कॉनवेने त्याच्या टी20 क्रिकेट कारकिर्दीत 5000 धावाही पूर्ण केल्या.

Devon Conway
IPL 2023: पंजाबचा शेवटच्या बॉलवर चेन्नईला घरचा आहेर! धवनचे शेर ठरले थालाच्या धुरंधरानां वरचढ

कॉनवेने या 5000 टी20 धावा 144 डावात पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे तो टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 5000 धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. त्याने याबाबतीत शॉन मार्शची बरोबरी केली आहे. शॉन मार्शनेही 144 डावात 5000 टी20 धावा पूर्ण केल्या होत्या. या यादीत कॉनवेने बाबर आझमला मागे टाकले आहे. बाबर आझमने 145 डावात 5000 टी20 धावा पूर्ण केल्या होत्या.

या यादीत अव्वल क्रमांकावर ख्रिस गेल असून त्याने 132 टी20 डावात 5000 धावा केल्या होत्या. तसेच दुसऱ्या क्रमांकावर केएल राहुल आहे. केएल राहुलने 143 टी20 डावात 5000 धावा पूर्ण केल्या होत्या.

पुरुष टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 5000 धावा करणारे क्रिकेटपटू

132 डाव - ख्रिस गेल

143 डाव - केएल राहुल

144 डाव - डेव्हॉन कॉनवे

144 डाव - शॉन मार्श

145 डाव - बाबर आझम

Devon Conway
IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सच्या मॅचदरम्यान फॅन्समध्ये राडा! मारामारी करतानाचा Video व्हायरल

पंजाबचा अखेरच्या चेंडूवर विजय

चेन्नईने कॉनवेच्या 92 धावांच्या खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 200 धावा केल्या. त्यानंतर 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग अखेरच्या चेंडूवर पंजाबने 6 विकेट्स गमावत पूर्ण केला. अखेरच्या चेंडूवर पंजाबला ३ धावांची गरज असताना सिकंदर रझा आणि शाहरुख खान यांनी तीन धावा पळून काढल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.

त्यापूर्वी, प्रभसिमरन सिंगने 24 चेंडूत 42 धावांची, लियाम लिव्हिंगस्टोनने 24 चेंडूत 40 धावांची आणि जितेश शर्माने 10 चेंडूत 21 धावांची खेळी केली. त्यामुळे पंजाबला या सामन्यात विजय मिळवण्यात यश आले.

गोलंदाजीत चेन्नईकडून तुषार देशपांडेने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच पंजाबकडून अर्शदीप सिंग, सिकंदर रझा, राहुल चाहर आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com