
AFC Champions League Two
गोव्याच्या फुटबॉलप्रेमींसाठी ही मोठी खुशखबर आहे. जगातील सर्वात लोकप्रिय आणि दिग्गज फुटबॉलपटूंमध्ये गणल्या जाणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला प्रत्यक्ष पाहण्याची संधी आता गोव्यातील चाहत्यांना मिळणार आहे. एफसी गोवा आणि रोनाल्डोचा सौदी अरेबियातील क्लब अल नासर हे दोन्ही संघ एएफसी चॅम्पियन्स लीग टू (AFC Champions League Two) च्या गट टप्प्यात एकाच गटात आले आहेत.
गट टप्प्यातील एक सामना गोव्यातील स्टेडियमवर खेळला जाणार असल्याचे अधिकृत वेळापत्रक लवकरच जाहीर होऊ शकते. त्यामुळे रोनाल्डो मैदानात उतरणार, त्याच्या खास ड्रिबलिंग, गोल करण्याची कला आणि करिश्मा गोव्याच्या प्रेक्षकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.
रोनाल्डो हा केवळ फुटबॉल स्टार नाही, तर जागतिक क्रीडा इतिहासातील एक आयकॉन आहे. पाच वेळा बॅलोन डी'ऑर (Ballon d'Or) जिंकलेला, रिअल माद्रिद, मॅंचेस्टर युनायटेड, युव्हेंटस यांसारख्या नामांकित क्लब्ससाठी खेळलेला हा खेळाडू आता सौदी अरेबियाच्या अल नासर संघासाठी गोल करत आहे.
अल नासर क्लबने ख्रिस्तियानो रोनाल्डो याचा करार २०२७ पर्यंत वाढविला. एका वृत्तानुसार, पुढील दोन वर्षांसाठी करारबद्ध करताना सौदी अरेबियातील श्रीमंत क्लबने रोनाल्डोशी सुमारे २००० कोटी रुपयांचा करार केला आहे, याशिवाय इतर बोनस आणि संघात १५ टक्के मालकी हक्कही आहेत. युरोपियन क्लब फुटबॉल मैदाने गाजवून रोनाल्डो २०२३ मध्ये अल नासर क्लबमध्ये दाखल झाला होता.
आशियाई क्लब स्पर्धेत एफसी गोवा संघ दुसऱ्यांदा खेळणार आहे. यापूर्वी त्यांनी २०२१ मध्ये एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेच्या गटसाखळीत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आयएसएल लीग विनर्स शिल्ड जिंकल्यामुळे मोहन बागान एएफसी चँपियन्स लीग २ स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.