Cristiano Ronaldo: रोनाल्डोवर बंदी? मेस्सीच्या घोषणा देणाऱ्या प्रेक्षकांच्या दिशेने केलेला असभ्य इशारा पडणार महागात

Cristiano Ronaldo may face suspension: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्याने रविवारी झालेल्या सामन्यात प्रेक्षकांच्या दिशेने असभ्य इशारा केला होता.
Cristiano Ronaldo
Cristiano Ronaldo X/AlNassrFC_EN

Cristiano Ronaldo may face ban due to his obscene gesture to crowd:

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रोनाल्डो बऱ्याचदा त्याच्या खेळाबरोबरच त्याच्या मैदानाबाहेरील गोष्टींमुळे सातत्याने चर्चेत येत असतो. आता तो त्याच्या असभ्य वर्तनामुळे चर्चेत आला असून त्याच्यावर कारवाईचीही दाट शक्यता आहे.

जवळपास दीड वर्षांपासून रोनाल्डो सौदी अरेबियामधील अल-नासर क्लबकडून खेळत आहे. त्याने या क्लबकडूनही अनेकदा चांगली कामगिरी केली आहे. त्याने रविवारी अल-शाबाब क्लबविरुद्ध झालेल्या सामन्यातही गोल नोंदवत अल नासरच्या विजयात योगदान दिले होते.

मात्र असे असतानाही त्याने प्रेक्षकांकडे पाहून अश्लिल हातवारे केल्याने तो अडचणीत आला आहे. झाले असे की रविवारी अल-नासर आणि अल-शबाब यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात अल-नासरने 3-2 धावांनी विजय मिळवला.

Cristiano Ronaldo
Messi Video: 'तू जिथे कुठे आहेस मॅराडोना...', आठव्यांदा बॅलन डी'ओर नावावर करताच मेस्सीने मनंही जिंकली

या सामन्यात प्रेक्षक सातत्याने रोनाल्डोचा कट्टर प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सीचे नाव घेत होते. ते ऐकून रोनाल्डोने प्रेक्षकांच्या दिशेने काही असभ्य हातवारे केले. त्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत असून मीडिया रिपोर्टनुसार त्याच्याविरुद्ध तपासही सुरू झाला आहे. तसेच दोन सामन्यांच्या निलंबनाची कारवाईही होऊ शकते.

सौदी मीडियाच्या महितीनुसार डेली मेलने रिपोर्ट दिला आहे की रोनाल्डोचे त्याच्या कृतीबद्दल सौदी फुटबॉल असोसिएशनने दोन सामन्यांसाठी निलंबन केले असून त्याच्यावर दंडही आकारला आहे.

जर त्याच्यावर खरंच निलंबनाची कारवाई झाली असेल, तर त्याला येत्या आठवड्यात अल-हझमविरुद्धच्या सामन्याला आणि एफसी चॅम्पियन लीगच्या उपांत्यपूर्व सामन्याला मुकावे लागू शकते. जर असे झाल्यास अल-नासरच्या संघासाठी हा मोठा धक्का आहे.

Cristiano Ronaldo
Cristiano Ronaldo: जखमी रोनाल्डोचा तो गोल अन् अल-नासरने जिंकला अरब क्लब चॅम्पियन्स कप

दरम्यान अल-नासर आणि अल-शबाब यांच्यात झालेल्या या सामन्यात शवटचे 4 मिनिटे राहिले, तोपर्यंत 2-2 अशी बरोबरी होती. परंतु, सामना संपण्यात 4 मिनिटे राहिले असतानाच अल नासरकडून तालिस्काने तिसरा गोल केला. त्यामुळे अल-नासरने विजय मिळवला.

या सामन्यात रोनाल्डोने 21 व्या मिनिटाला पहिला गोल केला होता. त्यानंतर तालिस्कानेच ४६ व्या मिनिटाला गोल केला होता. तसेच अल-शबाबकडून यानिक कारास्कोने पहिल्या हाफच्या अतिरिक्त वेळेत पहिला गोल केला होता, तर 67 व्या मिनिटाला कार्लोसने दुसरा गोल केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com