Cristiano Ronaldo
Cristiano RonaldoDainik Gomantak

Cristiano Ronaldo: ...तर रोनाल्डो पहिल्यांदाच भारतात खेळणार, अल-नासर आशिया चॅम्पियन्स लीगसाठी पात्र

Al-Nassr will Play AFC Champions League: रोनाल्डोच्या नेतृत्वातील अल-नासर क्लब आशिया चॅम्पियन्स लीग ग्रुप स्टेजसाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे रोनाल्डो भारतात खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Published on

Cristiano Ronaldo led Al-Nassr will Play AFC Champions League Group Stage and might face Mumbai City FC:

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नेतृत्वातील अल-नासर क्लबने बुधवारी आशिया चम्पियन्स लीगच्या प्लेऑफ सामन्यात दुबईच्या शाबाद अल अहली संघाला 4-2 अशा गोलफरकाने पराभूत केले.

या विजयामुळे अल-नासर क्लबने आशिया चम्पियन्स लीगच्या ग्रुप स्टेजमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता रोनाल्डो भारतात खेळायला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बुधवारी झालेल्या सामन्यात अल नासरकडून अँडरसन तालिस्काने पहिला गोल करत चांगली सुरुवात दिली होती. मात्र शाबाद अल-अहली संघाकडून याहन्या अल-घासानीने 18 आणि 46 व्या मिनिटाला गोल करत अल-नासर विरुद्ध आघाडी घेतली होती. मात्र, अल नासरने सामन्याच्या अखेरीस तीन गोल करत सामन्यात विजय मिळवला.

सुलतान अल-घानमने 88 व्या मिनिटाला अल-नासरसाठी दुसरा गोल नोंदवला. तर भरपाई वेळेत तालिस्काने आणि मार्सेलो ब्रोझोविक यांनी गोल करत अल-नासर संघाची आघाडी 4-2 अशी वाढवली. त्यानंतर शाबाद अल-अहलीला पुनरागमन करणे कठीण बनले आणि अल-नासरने विजयासह आशिया चॅम्पियन्स लीगच्या ग्रुप स्टेजमध्ये जागा पक्की केली.

Cristiano Ronaldo
Cristiano Ronaldo Record: रोनाल्डोचा भन्नाट हेडर, नवा रेकॉर्ड अन् अल नासरचा जबरदस्त विजय

19 वी आशिया चॅम्पियन्स लीग स्पर्धा सप्टेंबर 2023 ते मे 2024 दरम्यान होणार असून यात 5 झोनमधील 36 क्लब सहभागी होणार आहेत. त्यांचे ९ ग्रुप करण्यात येतील.

अल-नासरने वेस्ट झोनमधील पॉट-4 मध्ये आहे. तसेच भारतातून मुंबई सिटी एफसी हा क्लब या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. मुंबई सिटी एफसीने यंदा इंडियान सुपर लीग शिल्ड जिंकली होती. मुंबई सिटी एफसी वेस्ट झोनमधील पॉट-3 मध्ये आहे.

दरम्यान, जर आशिया चॅम्पियन्स लीगच्या ड्रॉमध्ये जर मुंबई सिटी एफसी आणि अल-नासर हे दोन्ही क्लब एकाच गटात आले, तर या दोन संघात सामने होती. तसेच रोनाल्डो पहिल्यांदाच भारतात खेळण्यासाठी येऊ शकतो.

आशिया चॅम्पियन्स लीग 2023-24 चा ड्रॉ 24 ऑगस्ट रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 4 वाजता क्वाललंपुर येथे सुरू होणार आहे.

Cristiano Ronaldo
Cristiano Ronaldo: जखमी रोनाल्डोचा तो गोल अन् अल-नासरने जिंकला अरब क्लब चॅम्पियन्स कप

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की मुंबई फुटबॉल एरिनामधील सध्याच्या इंफ्रास्ट्रक्टरल सेटअपमुळे ते आशिया चॅम्पियन्स लीगमधील मुंबई सिटी एफसीचे घरचे सामने आयोजित करू शकत नाहीत.

त्याचमुळे मुंबई सिटी एफसीचे घरचे सामने पुण्यातील श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बालेवाडी येथे खेळले जाणार आहेत. त्याचमुळे जर अल-नासर आणि मुंबई सिटी एफसी एकाच ग्रुपमध्ये आले, तर रोनाल्डो पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये खेळताना दिसू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com