विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरनंतर रोहित शर्मानेही खरेदी केली अलिबागमध्ये जमीन

भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने मंगळवारी अलिबागमध्ये पत्नी रितिका सजदेहच्या नावे खरेदी केलेल्या चार एकर जमिनीचा ताबा घेतला
Rohit Sharma

Rohit Sharma

Dainik gomantak

Published on
Updated on

भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने (Rohit Sharma) मंगळवारी अलिबागमध्ये पत्नी रितिका सजदेहच्या नावे खरेदी केलेल्या चार एकर जमिनीचा ताबा घेतला. रोहितसह रितिका आणि इतर दोन व्यक्तींनी मंगळवारी (14 नोव्हेंबर) अलिबाग उपनिबंधक कार्यालयात नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली. अलिबागमध्ये जमीन खरेदी करणारा रोहित शर्मा हा पहिला क्रिकेटर (Cricket) नाही. अलिबागमध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रवी शास्त्री आणि अजित आगरकर यांसारख्या क्रिकेटपटूंचीही मालमत्ता आहे.

रोहित शर्मा 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका (भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका) विरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाने आज म्हणजेच 16 डिसेंबर रोजी उड्डाण केले आहे. सराव सत्रादरम्यान रोहित शर्माला डाव्या हाताच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर व्हावे लागले. भारतीय संघ जानेवारीत 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळेल तेव्हा रोहित शर्मा आता पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेला जाण्याची शक्यता आहे.

<div class="paragraphs"><p>Rohit Sharma</p></div>
भारतीय खेळाडूने सोडला देश, आता ऑस्ट्रेलियन संघात निवड

रोहित शर्मा भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताची ही पहिली वनडे मालिका असणार आहे. 8 डिसेंबर रोजी रोहितला भारतीय संघाचा वनडे कर्णधार बनवण्यात आले आहे. यापूर्वी विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 कर्णधारपद सोडल्यानंतर त्याला टी-20 संघाचे कर्णधारपदही देण्यात आले होते.

या वृत्तानुसार, अलिबागच्या उपनिबंधक संजना जाधव म्हणाल्या, “रोहित शर्मा जमिनीच्या व्यवहारासंदर्भात मंगळवारी आमच्या कार्यालयात आला होता हे खरे आहे. पण ही जमीन त्याने विकत घेतली आहे की त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तीने हे आम्ही निश्चित करू शकत नाही.”

रोहितने विकत घेतलेली जमीन सुमारे चार एकर आहे आणि तिची बाजारातील किंमत सुमारे 9 कोटी रुपये आहे. रोहित शर्माची ही ज्या गावात जमिनी घेतली आहे त्यागावाला पहिलीच भेट असल्याचेही बोलले जात आहे. “जमीन त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे. त्यांनी उपनिबंधक कार्यालयात नोंदणीची औपचारिकता पूर्ण केली आणि नंतर एक छोटी पूजा करण्यासाठी गावात पोहोचले."

“जमीन विकणारा हा माझा ओळखीचा आहे. मी साक्षीदार म्हणून मालमत्तेच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. रोहितला मी गेल्या 10 वर्षांपासून ओळखतो. त्यांनी पत्नीच्या नावे जमीन खरेदी केली आहे. यावेळी दोन वकीलही उपस्थित होते. अस मत एका गावकऱ्याने व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com