भारतीय खेळाडूने सोडला देश, आता ऑस्ट्रेलियन संघात निवड

17 वर्षीय हरकिरत सिंग बाजवा (Harkirat Singh Bajwa) ऑफ स्पिनर असून त्याचा जन्म मोहाली येथे झाला.
Harkirat Singh Bajwa

Harkirat Singh Bajwa

Dainik Gomantak 

Published on
Updated on

अंडर-19 विश्वचषक (Under-19 World Cup)… असे व्यासपीठ जिथून भविष्यातील स्टार खेळाडू पुढे येतात. विराट कोहली (Virat Kohli), केन विल्यमसन, केएल राहुल, स्टीव्ह स्मिथ, बाबर आझम (Babar Azam) , जो रुट या सर्व दिग्गजांना प्रथम अंडर-19 विश्वचषकापासूनच खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. त्या स्तरावर फलंदाजी करताना ते भविष्याचे स्टार असल्याचेही चाहत्यांनी ओळखले. असाच एक भारतीय खेळाडू आता पुढील महिन्यात वेस्ट इंडिजमध्ये (West Indies) होणाऱ्या अंडर-19 विश्वचषकात भारतीय संघात नाही तर ऑस्ट्रेलियाच्या (Australia) संघात दिसणार आहे. हरकिरत सिंग बाजवाची (Harkirat Singh Bajwa) ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 संघात निवड झाली आहे. 17 वर्षीय हरकिरत सिंग बाजवा ऑफ स्पिनर असून त्याचा जन्म मोहाली येथे झाला. हरकिरत फक्त 7 वर्षांचा असताना त्याचे कुटुंब मेलबर्नला (Melbourne) शिफ्ट झाले होते. हरकिरतचे वडील बलजीत सिंग (Baljit Singh) हे मेलबर्नमध्ये टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, परंतु त्यांचा मुलगा एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे ज्याने अगदी लहान वयातच संपूर्ण ऑस्ट्रेलियात नाव कमावले आहे.

<div class="paragraphs"><p>Harkirat Singh Bajwa</p></div>
IND VS SA: विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेचा बदला घेणार? की ...

हरभजन, अश्विन आयडॉल

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, हरकिरत सिंग 7 वर्षांचा असताना मोहालीमध्ये स्ट्रीट क्रिकेट खेळायचा, पण ऑस्ट्रेलियाला पोहोचताच तो चेल्सी क्रिकेट क्लबमध्ये सामील झाला आणि तिथून त्याचा संपूर्ण खेळ बदलला. हरकिरत सिंग (Harbhajan Singh) हा ऑफस्पिनर आहे. विशेष म्हणजे बॉलिंग करण्याची स्टाईल हुबेहुब हरभजन सिंगसारखीच आहे. तो हरभजन सिंग जो ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज रिकी पाँटिंगसाठी (Ricky Ponting) घातक ठरला होता. हरकिरत सिंगची खास गोष्ट म्हणजे भज्जीशिवाय तो अश्विनलाही आपला आदर्श मानतो.

<div class="paragraphs"><p>Harkirat Singh Bajwa</p></div>
IND vs SA: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर

ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 संघात निवड झाल्याबद्दल हरकिरत म्हणाला, 'मी अश्विन आणि हरभजन सिंग या दोघांनाही माझा आदर्श मानतो. मी हरभजनची गोलंदाजी बघत मोठा झालो आहे, त्यामुळे माझी अॅक्शन त्याच्यासारखीच आहे. मेलबर्नमध्ये क्रिकेटचं धडे गिरवले. इथेच मला 16 वर्षांखालील क्रिकेट खेळण्याची संधीही मिळाली. हरकीरतने सांगितले की, 'माझे वडील कॅब चालवून कुटुंब चालवतात. विशेष म्हणजे मला त्याचा फायदाच झाला. कारण मी रोज वडिलांच्या टॅक्सीतून सराव सत्रासाठी जात असे.' ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे हरकिरतचे स्वप्न आहे. आणि त्याच्याकडे ज्या प्रकारची प्रतिभा आहे, ती तो साध्य करु शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com