सेंच्युरियन कसोटी : 10 वर्षात पहिल्यांदा आफ्रिकेत राहुल-मयंकचा धमाका

2006-07 च्या दौऱ्यात वसीम जाफर आणि दिनेश कार्तिक यांनी पहिल्यांदा हे यश मिळवले होते
Cricket News

Cricket News

Dainik gomantak

Published on
Updated on

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. भारतीय सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अग्रवाल सेंच्युरियन येथे खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या सुरुवातीच्या तासात दिसले. दोन्ही खेळाडूंनी 117 धावांची भागीदारी करून भारताला चांगली सुरुवात करून दिली.

दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी सामन्यांमध्ये भारतीय सलामीवीरांची ही केवळ तिसरी शतकी भागीदारी होती. 2006-07 च्या दौऱ्यात वसीम जाफर आणि दिनेश कार्तिक यांनी पहिल्यांदा हे यश मिळवले होते. केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात जाफर-कार्तिकने 153 धावा केल्या होत्या. यानंतर वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरने 2010-11 च्या मालिकेतasअशी खेळी केली होती.

<div class="paragraphs"><p>Cricket News</p></div>
YEAR END 2021: नीरजच्या सुवर्णपदकाने भारतीय अ‍ॅथलेटिक्सला 'सोनेरी दिवस' !

सेंच्युरियन कसोटीच्या चौथ्या डावात सेहवाग-गंभीरने 137 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) 50 किंवा त्याहून अधिक धावांची सलामीची भागीदारी करणारी मयंक-राहुल ही पाचवी भारतीय (India) जोडी आहे. 1996-97 च्या मालिकेत नयन मोंगिया आणि विक्रम राठोड या दोघांनी 90 धावांची भागीदारी केली होती. याशिवाय रवी-शास्त्री आणि अजय जडेजा यांनी 1992च्या दौऱ्यावर 68 धावांची सलामी दिली होती.

मयंकचा फॉर्म कायम न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) मुंबई कसोटीतील सुवर्ण फॉर्म कायम राखत मयंक अग्रवालने नऊ चौकार ठोकत 60 धावांची खेळी केली. मयंकचे कसोटी कारकिर्दीतील हे सहावे अर्धशतक होते. मयंकला लुंगी एनगिडीने एलबीडब्ल्यू आऊट केले. दुसऱ्या टोकाला केएल राहुलनेही शानदार फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले. तसेच केएल राहुलने नाबाद 68 धावांची खेळी केली होती. मात्र, टीम इंडियाचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा फार काही करू शकला नाही आणि पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

<div class="paragraphs"><p>Cricket News</p></div>
कॅप्टन्सीबद्दल रवी शास्त्रींनी 'या' मुद्द्यावर सोडले आपले मौन

पुजाराला एनगिडीने कीगन पीटरसनच्या हाती झेलबाद केले. सेंच्युरियन कसोटी सामन्यात टीम इंडिया 5 गोलंदाजांसह मैदानात उतरली आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर हे वेगवान गोलंदाज संघाचा भाग आहेत. दुसरीकडे, रविचंद्रन अश्विनला एकमेव फिरकी गोलंदाज म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com