YEAR END 2021: नीरजच्या सुवर्णपदकाने भारतीय अ‍ॅथलेटिक्सला 'सोनेरी दिवस' !

नीरज चोप्राने (Neeraj Chopra) 2021 मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारतीय अ‍ॅथलेटिक्समध्ये नवीन पर्व सुरु केले.
Neeraj Chopra

Neeraj Chopra

Dainik Gomantak 

Published on
Updated on

नीरज चोप्राने 2021 मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारतीय अ‍ॅथलेटिक्समध्ये नवीन पर्व सुरु केले. त्याने असे यश संपादन केले ज्याची देश शतकाहून अधिक काळ वाट पाहत होता. नीरजला देशवासीयांना सुपरहिरोचा दर्जा दिला. शेतकऱ्याचा मुलगा असणाऱ्या नीरजने (Neeraj Chopra) 7 ऑगस्ट रोजी 57.58 मीटर भालाफेक करुन केवळ भारतीय अ‍ॅथलेटिक्समध्येच (indian athletics) नाही तर भारतीय खेळांमध्येही नवा इतिहास रचला.

दरम्यान, हा त्याचा वैयक्तिकमधील सर्वोत्तम प्रयत्न होता. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक (olympic gold medal) जिंकणारा नेमबाज अभिनव बिंद्रानंतर नीरज दुसरा भारतीय बनला. नीरज हा सुरुवातीपासूनच पदकासासाठी दावेदार मानला जात होता. परंतु त्यांने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. भारतीय खेळाडूंनी एकेकाळी ज्याचे स्वप्न पाहिले होते ते नीरजच्या रुपात साध्य झाले. अ‍ॅथलेटिक्समधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले.

<div class="paragraphs"><p>Neeraj Chopra</p></div>
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने मानले चाहत्यांचे आभार

चोप्राच्या सुवर्णाने अ‍ॅथलेटिक्समध्ये नवी सुरुवात केली

सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज म्हणाला होता, 'हे अविश्वसनीय आहे. हा माझ्यासाठी आणि माझ्या देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. हा क्षण माझ्यासोबत कायम राहील.' नीरजच्या सुवर्णपदकाने भारतीय अ‍ॅथलेटिक्समध्ये एक नवीन सुरुवात केली, तर देशाने या वर्षी दिग्गज मिल्खा सिंग यांच्या निधनाने एका युगाचा अंतही पाहिला. मिल्खा सिंग, स्वतंत्र भारतातील महान खेळाडूंपैकी एक, ज्यांचे 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर शर्यतीत कांस्यपदक कमी फरकाने हुकले. नीरजच्या ऐतिहासिक कामगिरीच्या दोन महिन्यांपूर्वी, मिल्खा सिंग यांचे चंदीगडमध्ये निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. नीरजने आपले पदक या महान खेळाडूला समर्पित केले.

<div class="paragraphs"><p>Neeraj Chopra</p></div>
Neeraj Chopra: ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला मोठा धक्का

डिस्कस थ्रोअर कमलप्रीत सिंगही (Kamalpreet Singh) ऑलिम्पिकमध्ये काही काळ चर्चेत होता. पात्रता फेरीत तिने दुसरे स्थान पटकावले होते परंतु अंतिम फेरीत तिला सहावे स्थान मिळाले होते. पुरुषांच्या 4×400m रिले संघाने आशियाई विक्रम मोडला परंतु तरीही अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात ते अयशस्वी ठरले, यावरुन ऑलिम्पिकमध्ये स्पर्धा किती तीव्र आहे हे दिसून येते.

दुती आणि हिमा निराश झाले

अविनाश साबळे हा दुसरा भारतीय होता ज्याने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये आपला राष्ट्रीय विक्रम सुधारला परंतु तो अंतिम फेरीत प्रवेश करू शकला नाही. हिमा दास या स्पर्धेतही पात्र ठरु शकली नाही. या वर्षीही भारतीय युवा खेळाडूंनी केनियातील जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी केली. अंजू बॉबी जॉर्जची शिष्या, लांब उडी धावपटू शैली सिंग आणि 10,000 मीटर वॉकर अमित खत्री यांनी रौप्यपदक जिंकले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com