गोव्यातील अधिकांश क्रिकेट सामने ‘टर्फ’वर

विपुल फडके यांची माहिती : कोविडमुळे मर्यादा येऊनही 147 सामन्यांचे आयोजन
Cricket on turf
Cricket on turf Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) राज्यातील क्रिकेट ‘टर्फ’ खेळपट्टीवरच खेळविण्याचे ध्येय बाळगले आहे. त्यास 2021-22 मोसमात अधिकांश यश आले. फक्त 11 सामनेच मॅटिंग खेळपट्टीवर झाले. कोविडमुळे आयोजनावर मर्यादा येऊनही एकूण 147 सामने झाले आणि प्रमुख स्पर्धा पूर्ण करण्यात यश आल्याची माहिती जीसीए सचिव विपुल फडके यांनी दिली. (Cricket matches to be played on turf in Goa)

Cricket on turf
अमेयचा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळात धडाका

जीसीएचा 2021-22 क्रिकेट स्पर्धा मोसम सोमवारी (ता. 30 मे) संपला. कोविडमुळे यावेळचा स्पर्धात्मक मोसम उशिरा सुरू झाला. फेब्रुवारी ते मे या कालावधीत प्रीमियर लीग, अ, ब आणि क गट स्पर्धा घेण्यात आल्या. मध्यंतरी मे महिन्यात पावसामुळे वेळापत्रक काही प्रमाणात विस्कटले, मात्र पावसाने उसंत घेतल्यामुळे स्पर्धा पूर्णत्वास गेल्या.

आश्वासनपूर्तीकडे वाटचाल

विपुल फडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अ गटात 33, ब गटात 85, क गटात 20 सामने झाले. प्रीमियर लीग स्पर्धेत एकूण 9 सामने झाले. क गटातील उत्तर विभागीय सामन्यांसाठी टर्फ मैदानाचा प्रश्न उद्‍भवला. त्यामुळे या विभागातील 11 सामने शापोरा येथील पंचायत मैदानावर मॅटिंग विकेटवर खेळवावे लागले. हा अपवाद वगळता बाकी 136 सामने टर्फ खेळपट्टीवर झाले. ‘‘अधिकांश सामने टर्फ खेळपट्टीवर होणे ही बाब जीसीएसाठी फार मोठी असून आम्ही आश्वासनपूर्तीकडे वाटचाल केली आहे,’’ असे विपुल यांनी सांगितले. जीसीएने यंदा सामने पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदान, पणजी जिमखान्याचे भाऊसाहेब बांदोडकर मैदान, मडगाव क्रिकेट क्लबचे डॉ. राजेंद्र प्रसाद स्टेडियम, सांगे येथील जीसीए मैदान आणि धारबांदोडा पंचायत मैदानावर घेतले. या सर्व ठिकाणी टर्फ खेळपट्टीची व्यवस्था आहे.

Cricket on turf
Sourav Ganguly News: सौरव गांगुलीने राजीनाम्याच्या मुद्यावर सोडले मौन

जीसीएने मानले सर्वांचे आभार

मोसम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल जीसीएतर्फे विपुल फडके यांनी संघटनेची व्यवस्थापकीय समिती, सर्व क्लब, स्पर्धा समन्वयक, सपोर्ट स्टाफ, पंच, स्कोअरर्स यांचे आभार मानले आहेत. असंख्य अडचणी आणि अनपेक्षित पावसाचा अडथळा यावर मात करून मोसम यशस्वी करण्यासाठी एकही सुट्टी न घेता मैदान कर्मचारी व क्युरेटर्स यांनी घेतलेले अथक परिश्रम याबद्दल जीसीएने त्यांचे विशेष आभार मानले आहेत. यंदा दीर्घकाळानंतर प्रीमियर लीग स्पर्धेतील सामने तीन दिवसांचे घेण्यात आले. आगामी मोसमात जीसीए संघासाठी पदोन्नती आणि पदावनती प्रक्रिया सुरू करणार असल्याचेही विपुल यांनी नमूद केले.

सामन्यांची आकडेवारी

- प्रीमियर लीग : 9

- अ गट : उत्तर विभागात 15, दक्षिण विभागात 17 सामने, 1 राज्यस्तरीय अंतिम लढत

- ब गट : बार्देश विभागात 15, तिसवाडी विभागात 27, डिचोली-सत्तरी विभागात 14, दक्षिण विभागात 26 सामने, 3 उपांत्य-अंतिम सामने

- क गट : उत्तर विभागात 11, दक्षिण विभागात 8 सामने, 1 राज्यस्तरीय अंतिम सामना

2021-22 मोसमातील विजेते

- अ गट : राज्यस्तरीय : लापाझ गार्डन्स क्लब, उत्तर विभाग : खोर्ली इलेव्हन, दक्षिण विभाग : लापाझ गार्डन्स

- ब गट : राज्यस्तरीय : तरवळे क्रिकेट क्लब, उत्तर विभाग : स्टॅमिना क्रिकेट क्लब, दक्षिण विभाग : तरवळे क्लब

- क गट : राज्यस्तरीय : एमपीटी स्पोर्टस क्लब, उत्तर विभाग : पॉलिटिक्स इलेव्हन, दक्षिण विभाग : एमपीटी स्पोर्टस क्लब

- प्रीमियर लीग विजेते : जीनो स्पोर्टस क्लब, उपविजेते : धेंपो स्पोर्टस क्लब

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com