अमेयचा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळात धडाका

ओडिशातील ‘इंटरनॅशनल चेस’ स्पर्धेत चौथा क्रमांक
International chess
International chessDainik Gomantak

पणजी : गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळपटू अमेय अवदी याने ओडिशात झालेल्या १३व्या केआयआयटी इंटरनॅशनल चेस बुद्धिबळ स्पर्धेत भारतीयांतर्फे सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. स्पर्धेच्या मुख्य गटात धडाकेबाज खेळ करताना त्याने चौथा क्रमांक पटकावला. ( Ameya's best performance in international chess)

International chess
गोमंतकीय व्हिन्सी बार्रेटो चेन्नईयीन संघात

अमेयला स्पर्धेत 14 वे मानांकन होते. त्याचे सध्या 2389 एलो गुण आहेत. बिगर ग्रँडमास्टर खेळाडूंत त्याची कामगिरी सर्वोत्कृष्ट ठरली. अमेयने दहा फेऱ्यांनंतर साडेसात गुण नोंदविले. बेलारुसचा ग्रँडमास्टर किरिल स्तुपाक व रशियन ग्रँडमास्टर बोरिस साव्हचेन्को यांचेही तेवढेच गुण झाले. टायब्रेकर गुणांत किरिल याला दुसरा, बोरिसला तिसरा, तर अमेयला चौथा क्रमांक मिळाला. ताजिकिस्तानचा ग्रँडमास्टर फारुख अमोनातोव याने साडेआठ गुणांसह विजेतेपद प्राप्त केले. स्पर्धेत एकूण 175 खेळाडूंनी भाग घेतला.

बलाढ्य खेळाडूंविरुद्ध दमदार खेळ

स्पर्धेत अमेयने बलाढ्य खेळाडूंविरुद्ध दमदार खेळ केला. त्याने रशियन ग्रँडमास्टर बोरिस साव्हचेन्को (एलो २५२४, तसेच शेवटच्या फेरीत अव्वल मानांकित ताजिकिस्तानचा ग्रँडमास्टर फारुख अमोनातोव ( एलो 2622) यांना बरोबरीत रोखले. त्याने श्रीलंकन आयएम रमेश वीरवर्दने, दिल्लीचा फिडे मास्टर आर्यन वर्षिनी, आसामचा कँडिडेट मास्टर मयांक चक्रवर्ती, तमिळनाडूचा आर. शाधुर्शन, पश्चिम बंगालचे समृद्ध घोष व अलेख्य मुखोपाध्याय, उत्तर प्रदेशचा शिवपवनतेज शर्मा यांना पराजित केले. स्पर्धेत अमेयने सहा डाव जिंकले, तर तीन डाव बरोबरीत राखले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com