Olympics विजेत्या लवलीना बोरगोहेनच्या ट्विटने उडवून दिली खळबळ

Lovlina Borgohain: लवलीना बोरगोहेनने राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीपूर्वी एक ट्विट करुन खळबळ उडवून दिली आहे.
Lovlina Borgohain
Lovlina Borgohain Dainik Gomantak
Published on
Updated on

Lovlina Borgohain: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकल्यानंतर लवलीना बोरगोहेनने (Lovlina Borgohain) राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीपूर्वी एक ट्विट करुन खळबळ उडवून दिली आहे. लवलीनाने ट्विटमध्ये म्हटले की, 'माझ्या प्रशिक्षकांना योग्य वागणूक दिली जात नाहीये. या राजकारणामुळे खूप मानसिक ताण येत आहे.' लवलीनाने आपला संपूर्ण अनुभव ट्विटरवर शेअर केला आहे.

दरम्यान, 'आज मी अत्यंत दु:खाने सांगते की, माझ्यासोबत खूप छळ होत आहे. प्रत्येक वेळी मी आणि माझे प्रशिक्षक ज्यांनी मला ऑलिम्पिकमध्ये (Olympics) पदक मिळवून देण्यास मदत केली, त्यांना त्रास दिला जात आहे. या प्रशिक्षकांपैकी एक संध्या गुरुंगजी द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त आहेत. माझे दोन्ही प्रशिक्षक अनेकवेळा हात जोडून प्रशिक्षणासाठी शिबिरात सामील झाले आहेत.'

Lovlina Borgohain
Olympics 2036चं भारतात होणार आयोजन? रशिया मदत करण्यास तयार

लवलीनाने पुढे लिहिले की, 'सध्या माझी प्रशिक्षक संध्या गुरुंगजी कॉमनवेल्थ व्हिलेजच्या (Commonwealth Village) बाहेर आहेत, त्यांना प्रवेश मिळत नाहीये. स्पर्धेच्या आठ दिवस आधी माझी प्रशिक्षण प्रक्रिया थांबली आहे. माझ्या दुसऱ्या प्रशिक्षकालाही भारतात परत पाठवण्यात आले आहे. त्यामुळे मला खूप मानसिक त्रास होत आहे. मला स्पर्धेवर लक्ष केंद्रित कसे करावे हे समजत नाही. या राजकारणामुळे (Politics) मला माझे CWG खराब करायचे नाही. मला आशा आहे की, या राजकारणाचा बिमोड करुन मी माझ्या देशासाठी पदक आणू शकेन. जय हिंद!'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com