C. K. Naidu Trophy: गोव्याच्या विजयात मनीषच्या 6 विकेट

C. K. Naidu Trophy: केरळला 121 धावांनी हरविले
Manish Kakode
Manish Kakode Dainik Gomantak
Published on
Updated on

C. K. Naidu Trophy: लेगस्पिनर मनीष काकोडे (६-३६) याच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात गोव्याने केरळवर १२१ धावांनी विजय नोंदविला. २७२ धावांच्या आव्हानासमोर पाहुण्या संघाचा दुसरा डाव १५० धावांत आटोपला.

सांगे येथील जीसीए मैदानावर बुधवारी सामन्याच्या शेवटच्या दिवशी चहापानानंतर लगेच गोव्याच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

चहापानापूर्वीच्या शेवटच्या षटकात चिवट झुंज दिलेल्या वरुण नयनार (५९) याला बाद करून अझान थोटा याने गोव्याच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. ७ बाद १३९ वरून मनीषने बाकी तिन्ही गडी बाद करून संघाचा यंदाचा पहिलाच विजय साकारला.

सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेरच्या ७ बाद १७५ धावांवरून गोव्याचा दुसरा डाव बुधवारी सकाळी २०८ धावांत संपुष्टात आला. काल १०७ धावांवर नाबाद राहिलेला अभिनव तेजराणा १२२ धावांवर बाद झाला. पहिल्या डावातील ६३ वांच्या आघाडीसह गोव्यापाशी एकूण २७१ धावांची आघाडी जमा झाली.

उपाहारापूर्वीच लखमेश पावणे व शुभम तारी यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केल्यामुळे केरळची २ बाद २० अशी स्थिती झाली.

उपाहारानंतरच्या खेळात मनीषने स्वतःच्या गोलंदाजीवर शॉन रॉजर याचा झेल पकडून चौथ्या विकेटसाठीची ४२ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. ४ बाद ९३ वरून केरळचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले.

दोन पराभवानंतर विजय

स्पर्धेत आंध्र व छत्तीसगडविरुद्ध डावाने पराभव पत्करल्यानंतर गोव्याने अखेर विजयाची चव चाखली. सांगे येथे केरळला १२१ धावांनी हरविल्यानंतर आता याच मैदानावर त्यांचा तमिळनाडूविरुद्ध पुढील सामना ४ फेब्रुवारीपासून खेळला जाईल.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः ३३७

केरळ, पहिला डाव ः २७४

गोवा, दुसरा डाव (७ बाद १७५ वरून) ः ६९.१ षटकांत सर्वबाद २०८ (अभिनव तेजराणा १२२, लखमेश पावणे ८, रोहन बोगाटी नाबाद ९, शुभम तारी ०, अखिन २-४४, पवन राज ५-५९, शॉन रॉजर ३-३१).

केरळ, दुसरा डाव ः ५६.४ षटकांत सर्वबाद १५० (एम. एस. सचिन १९, वरूण नयनार ५९, शॉन रॉजर २६, जे. अनंतकृष्णन ११, शुभम तारी ९-२-२६-१, लखमेश पावणे ११-२-३३-१, अभिनव तेजराणा २-०-१४-०, राहुल मेहता १०-१-२०-०, मनीष काकोडे १६.४-२-३६-६, रोहन बोगाटी ६-०-१७-१, अझान थोटा २-२-०-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com