FIFA World Cup 2022: खेळाडू देतायेत विविध संदेश, पण शांततेत!

फिफा वर्ल्डकप 2022 दरम्यान काही संघांनी काहीतरी संदेश देण्याच्या किंवा विरोध करण्यासाठी आवाज उठवला आहे. पण या आवाजाला अंहिसेची किंवा शांततेची किनार लाभली आहे.
Iran National Football Team
Iran National Football TeamDainik Gomantak

FIFA World Cup 2022: कतारमध्ये 20 नोव्हेंबरपासून फिफा फुटबॉल वर्ल्डकपला सुरुवात झाली आहे. पण पहिल्या 10 दिवसातच काही रोमांचकारी सामने पाहायला मिळाले. चकीत करणारे मैदानातील निकाल समोर आले. पण केवळ मैदानावरील घटनांमुळेच नाही, तर मैदानाबाहेरील अनेक घटनांमुळे देखील ही स्पर्धा चर्चेेचे कारण ठरत आहे.

तसं पाहिले तर फुटबॉल हा सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. काही खेळ हे मोजक्या देशांपुरते मर्यादीत आहेत. पण फुटबॉल असा खेळ जो जवळपास जगभरातील सर्वच देशांत खेळला जातो. त्यामुळे त्याचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणात आढळतो आणि हेच कारण आहे की फुटबॉलमध्ये घडणाऱ्या घटनांचा परिणामही मोठा होता.

Iran National Football Team
FIFA World Cup 2022 पाहण्यासाठी 5 मुलांच्या आईचा थेट महिंद्रा थारमधून केरळ ते कतार प्रवास

अगदी सोशल मीडियावर सर्वाधिक चाहते असणाऱ्या जगभरातील खेळाडूंच्या यादीतही सुरुवातीच्या 10 क्रमांकामध्येही फुटबॉलपटूंचे वर्चस्व आहे. त्यामुळे अर्थातच फुटबॉलमध्ये अगदी छोट्या घटनाही घडल्या तरी त्याची चर्चा होते.

अगदीच सर्वांना पटकन लक्षात येईल असे उदाहरण द्यायचे झाले तर युरो 2020 स्पर्धेदरम्यान गेल्यावर्षी ख्रिस्तियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) एका पत्रकार परिषदेत 'कोका-कोला'ची बॉटल त्याच्या समोरून हटवली होती आणि त्याऐवजी पाणी प्या, असा सल्ला दिलेला. या घटनेनंतर कोका-कोलाची ब्रँड व्हॅल्यू मोठ्या प्रामाणात खाली घसरली होती.

आता कतारला सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकपही (FIFA World Cup 2022) अशाच काही घटनांमुळे चर्चेत येत आहेत. काही संघांनी काहीतरी संदेश देण्याच्या किंवा विरोध करण्यासाठी आवाज उठवला आहे. पण या आवाजाला अंहिसेची किंवा शांततेची किनार लाभली आहे.

अनेकदा आपण असे म्हणतो की तलवारीपेक्षा लेखणी धारदार असते किंवा अनेकदा आवाजाच्या ताकदीपुढे शांततेच केलेली क्रांती वरचढ ठरते. काहीशा अशाच प्रकारे शांततेच काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न यावर्षीच्या फुटबॉल वर्ल्डकपमधून होताना दिसत आहे.

Iran National Football Team
FIFA World Cup 2022: बेल्जियमच्या धक्कादायक पराभवानंतर उसळल्या दंगली; जमावाकडून तोडफोड अन् जाळपोळ

याचीच उदाहरणे द्यायची झाल्यास वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यापूर्वी इराणच्या संघातील खेळाडूंनी राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला. राष्ट्रगीत सुरू होताच सर्व खेळाडूंनी मौन धारण केले. यामागे इराणमध्ये सुरु असलेली हिजाबविरोधी निदर्शने असल्याचे सांगितले गेले.

खरंतर सप्टेंबरपासूनच इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शने सुरु आहेत. यामागचे कारण 22 वर्षीय महसा अमिनीचा मृत्यू. तिने हिजाब न घातल्यामुळे तिला सप्टेंबरमध्ये ताब्यात घेतले होते. त्यानंतर तीन दिवसातच तिचा मृत्यू झाला. त्यावेळी तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. पण, तेव्हापासून हिजाबविरुद्धच्या निदर्शनांना मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. त्यामुळे इराण संघानेही राष्ट्रगीत गाण्यास नकार देत या निदर्शनांना एकप्रकारे समर्थन दिले होते.

Iran National Football Team
FIFA World Cup: कतारमध्ये राष्ट्रगीत गाण्यास इराणी संघाचा नकार, नेमकं झालं तरी काय?

इतकेच नाही, तर इंग्लड संघाचा कर्णधार हॅरि केन हा 'वन लव्ह' लिहिलेले आर्म बँड्स घालणार होता. ज्यामागे कारण होते की ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिकरित्या लैंगिकतेबद्दल भाष्य केल्यास शिक्षेला सामोरे जावे लागते, त्याला विरोध करण्यासाठी हा आर्मबँड तो घालणार होता.

मात्र, नंतर असे समोर आले की फिफाने खेळाडूंना असा बँड घातल्यास कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा दिला होता. कारण कतारमध्येही लैंगिकतेबद्दल अनेक कडक नियम आहेत.

अगदी याच स्पर्धेदरम्यान असे समोर आले होते की अमेरिका आणि वेल्स यांच्यातील सामन्यादरम्यान सुरक्षा कर्मचार्‍यांनी अमेरिकन पत्रकार ग्रँट वाहल याला रेनबो टी-शर्ट घातला असल्याने त्याला आत जाण्यापासून रोखले होते. हा टी-शर्ट समलिंगी समुदायाला (LGBTQ समुदाय) समर्थन देण्यासाठी परिधान केला जातो. हा टी-शर्ट कतारच्या नियमांविरुद्ध होता, त्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती.

पण नंतर फिफाने 'नो डिस्क्रिमिनेशन' (भेदभावाला नकार) असे लिहिलेला बँड परिधान करण्यास हॅरी केनला परवानगी दिली होती. त्यामुळे त्याने 'नो डिस्क्रिमिनेशन'चा बँड घातला होता

त्याचबरोबर इंग्लंडच्या खेळाडूंनी यावर्षीच्या फिफा वर्ल्डकपच्या सामन्यांदरम्यान गुडघ्यावर बसून 'सर्वसमावेशकता महत्वाची आहे', या गोष्टीला समर्थन दिले होते, म्हणजेच त्यांनी भेदभावाला विरोध केला होता. खरंतर गुडघ्यावर बसणे हे कृत्य प्रतिकात्मकरित्या एखाद्या गोष्टीविरुद्ध शांततेत केलेला विरोध दर्शवण्यासाठी केले जाते. यापूर्वी क्रिकेटमध्येही कृष्णवर्णीयांविरुद्ध होणाऱ्या अन्यायाबद्दल अनेक क्रिकेटपटू, संघांनी टी20 वर्ल्डकपदरम्यान गुडघ्यावर बसून आपला विरोध दर्शवला होता.

एकूणच, फिफा वर्ल्डकप 2022 च्या पहिल्या 10 दिवसातच खेळाडूंनी केलेल्या या कृत्यांचे काय परिणाम होणार हे पाहावे लागेल. तसेच यापुढेही या स्पर्धेत अशा प्रकारच्या घटना घडणार का, त्याचे परिणाम कसे होतील, हे देखील पाहावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com