आय-लीग फुटबॉल चर्चिल स्पर्धेत ब्रदर्सची विजयी घोडदौड

चुरशीच्या लढतीत राजस्थान युनायटेडवर मात
आय-लीग फुटबॉल चर्चिल स्पर्धेत ब्रदर्सची विजयी घोडदौड
आय-लीग फुटबॉल चर्चिल स्पर्धेत ब्रदर्सची विजयी घोडदौडDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : चर्चिल ब्रदर्सने आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना मंगळवारी राजस्थान युनायटेडवर चुरशीच्या लढतीत 2-1 फरकाने मात केली. स्पर्धेच्या विजेतेपद फेरीतील सामना पश्चिम बंगालमधील नैहाटी स्टेडियमवर झाला.

सामन्याच्या भरपाई वेळेत रेड कार्डमुळे एक खेळाडू कमी होऊनही चर्चिल ब्रदर्सने आघाडी गमावू दिली नाही. माजी आय-लीग विजेते आता स्पर्धेत सात अपराजित असून त्यांचा हा ओळीने पाचवा विजय ठरला. एकंदरीत त्यांचा हा सातवा विजय असून 13 लढतीनंतर 23 गुण झाले आहेत. राजस्थानला 14व्या लढतीत तिसरा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्यांचे १९ गुण कायम राहिले.

आय-लीग फुटबॉल चर्चिल स्पर्धेत ब्रदर्सची विजयी घोडदौड
पोरस्कडे न्हयबाग येथे बेकायदा रेती काढणाऱ्या 26 होड्या जप्त

ताजिकिस्तानचा आघाडीपटू कोमरोन तुर्सुनोव याने 23व्या मिनिटास चर्चिल ब्रदर्सला आघाडी मिळवून दिली. नंतर 45+3व्या मिनिटास राजस्थान युनायटेडच्या तारीफ अखंड याने स्वयंगोल केल्यामुळे विश्रांतीला चर्चिल ब्रदर्सच्या खाती दोन गोलची आघाडी जमा झाली. उत्तरार्धात राजस्थान युनायटेडची पिछाडी कमी झाली. 68व्या मिनिटास एन. प्रीतम सिंग याने गोल केला. चर्चिल ब्रदर्सचा बदली खेळाडू क्युआन गोम्स याला सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे 90+3व्या मिनिटास रेड कार्डसह मैदान सोडावे लागले.

सामन्याच्या कालावधीत दोन्ही संघांत कमालीची चढाओढ दिसली. दोन्ही संघांच्या प्रशिक्षकांत, तसेच डग-आऊटमध्येही तणावग्रस्त स्थिती उदभवली. त्यामुळे रेफरीना संबंधितांना ताकीद द्यावी लागली.

पराभवाचा वचपा काढला

आय-लीग स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात चर्चिल ब्रदर्सला राजस्थान युनायटेडकडून 2-0 फरकाने पराभव पत्करावा लागला होता. मंगळवारी गोव्यातील संघाने त्या पराभवाचा वचपा काढला. दोन्ही टप्प्यात मिळून सात सामने अपराजित राहताना चर्चिल ब्रदर्सने आता सहा विजय व एक बरोबरी नोंदविली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com