I-League football tournament : पंजाब एफसीविरुद्ध चर्चिल ब्रदर्सची कसोटी

I-League football tournament : माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सची बलाढ्य पंजाब एफसीविरुद्ध लढत
I-League football tournament
I-League football tournamentdainikgomantak
Published on
Updated on

पणजी : आय-लीग (I-League) फुटबॉल स्पर्धेत माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सची बलाढ्य पंजाब एफसीविरुद्ध कसोटी लागेल. त्यांच्यातील सामना शुक्रवारी (ता. ४) पश्चिम बंगालमधील नैहाटी स्टेडियमवर खेळला जाईल.

कोविड-१९च्या तिसऱ्या लाटेमुळे खंडित झालेली स्पर्धा पुन्हा सुरू झाली आहे. त्यानंतर दोन्ही संघ शुक्रवारी पहिला सामना खेळतील. गेल्या २६ डिसेंबर रोजी पहिल्या फेरीत पंजाबने राजस्थान युनायटेडला २-० फरकाने हरवून पूर्ण तीन गुणांची कमाई केली होती, तर गतविजेत्या गोकुळम केरळाकडून चर्चिल ब्रदर्सला १-० फरकाने हार पत्करावी लागली होती.

पंजाब एफसीचे प्रशिक्षक ॲश्ली वेस्टवूड शुक्रवारच्या लढतीबाबत आशावादी आहेत. स्पर्धा खंडित झाल्यानंतर संघाने चार आठवड्यांची विश्रांती घेतली, नंतर स्पर्धा पुन्हा सुरू होण्यापूर्वी दोन आठवडे अगोदर संघाने एकत्रितपणे सरावास सुरवात केली. खेळाडू तंदुरुस्त असून चर्चिल ब्रदर्सही विजेतेपदासाठी दावेदार असल्याने सामना महत्त्वाचा आहे, असे वेस्टवूड यांनी नमूद केले.

I-League football tournament
Ranji Cricket : शतकवीर चिराग, जॅक्सनमुळे सौराष्ट्र सुस्थितीत

चर्चिल ब्रदर्स संघ पहिल्या फेरीतील पराभव विसरूनच मैदानात उतरणार असल्याचे सहाय्यक प्रशिक्षक मथायस कॉस्ता यांनी स्पष्ट केले. सामन्यात अधिक संधी निर्माण करणे आणि गोल नोंदविणे हेच संघाचे मुख्य लक्ष्य राहील, असे ते म्हणाले. संघातील नवा खेळाडू कोमरॉन तुर्सूनोव्ह याच्या समावेशामुळे आक्रमण जास्त धारधार होण्याची अपेक्षा माजी विजेत्यांना आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com